ठाणे:  मराठा समाजाच्या आरक्षणासाठी (Maratha Reservation) लढा देणारे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Thane Sabha) यांची सभा मंगळवारी ठाण्यातील गडकरी रंगायतन या ठिकाणी होणार आहे. यासाठी पोलीस दल देखील सज्ज  झाले आहे. त्यासाठी ठाणे पोलिसांनी वाहतूक मार्गामध्ये बदल केला आहे आणि काही ठिकाणी प्रवेश बंदी करण्यात आली आहे. 


जरांगे पाटील यांच्या होणाऱ्या सभेच्या ठिकाणची  पाहणी पोलिसांनी केली आहे. तसेच योग्य सूचना आयोगाला दिल्या आहेत. पोलिसांकडून विशेष बंदोबस्त ठेवण्यात आला आहे तर सखल मराठा समाज, मराठा क्रांती मोर्चाचा आयोजक कार्यकर्त्याना आयकार्ड  देखील दिले जाणार आहेत. 


असे असतील ठाण्यातील वाहतुकीचे बदल


सकाळी 6 ते दुपारी 1 वाजेपर्यंत हे वाहतूक बदल लागू असणार आहेत. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या ठिकठिकाणी जाहीर सभा होत आहेत. गडकरी रंगायतन नाट्यगृहात त्यांची सभा होणार आहे. सभेला येण्यासाठी खारेगाव टोलनाका, माजिवडा, नितीन कंपनी, ठाणे महापालिका मुख्यालय, अल्मेडा चौक, वंदना सिनेमा मार्ग, गजानन महाराज चौक, पु. ना. गाडगीळ चौक, मुस चौक, तलावपाली येथील छत्रपती शिवाजीमहाराजांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करून ते गडकरी रंगायतनमध्ये जाणार आहेत.


या कालावधीत वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून ठाणे पोलिसांनी शहरात वाहतुक बदल लागू केले आहेत. डाॅ. मुस चौक येथून गडकरी चौकाच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या वाहनांना डाॅ. मुस चौकाजवळ प्रवेशबंदी असेल. येथील वाहने आनंद टाॅवर येथेजांबली नाका, टेंभीनाका मार्गे जातील.


प्रवेश बंद - 1) डॉ. मुस चौक कडून गडकरी सर्कलकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना डॉ. मुस चौक येथे बंद' करण्यात येत आहे.


पर्यायी मार्ग सदर वाहने डॉ. मूस चौक येथून सरळ टॉवर नाका टेंभी नाका मार्गे इच्छित स्थळी जातील.


प्रवेश बंद - 2) गडकरी सर्कल कडून डॉ. मुस चौकाकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना गडकरी सर्कल येथे 'प्रवेश बंद' करण्यात येत आहे.


पर्यायी मार्ग सदर वाहने गडकरी येथून अल्मेडा चौक वंदना टी पॉईंट गजानन चौक तीन पेट्रोल पंप - हरिनिवास सर्कल मार्गे इच्छित स्थळी जातील.


प्रवेश बंद - 3) न्यु इंग्लिश स्कूल समोरील गल्लीतून राम मारूती रोडकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना न्यु इंग्लिश स्कूल कट येथे 'प्रवेश बंद' करण्यात येत आहे.


पर्यायी मार्ग सदर वाहने बेडेकर हॉस्पिटल येथून राजमाता वडापाव मार्गे इच्छित स्थळी जातील.


प्रवेश बंद - - 4) पु. ना. गाडगीळ चौकातून तलावपाळी कडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना पु. ना. गाडगीळ चौक येथे 'प्रवेश बंद' करण्यात येत आहे.


पर्यायी मार्ग सदर वाहने राम मारूती रोड वरील येणारी व जाणारी वाहने श्रद्धा वडापाव, गजानन महाराज चौक, राजमाता वडापाव मार्गे इच्छित स्थळी जातील.


मराठा आरक्षण जरांगे पाटील यांचे स्वागत ,रूट आणि सभा


सभेचे ठिकाण- गडकरी रंगायतन
वेळ- सकाळी 9 ते 10 च्या दरम्यान


स्वागताचे ठिकाण ठिकाण पुढील प्रमाणे, 


1- खारेगाव टोल नाका- स्वागत 


2- माजीवडा जंक्शन-25 jcb लागणार ( पोलिस 12 jcb ची परमिशन देत आहे समन्वयक याना मान्य नाही )


3 - कॅडबरी जंक्शन


4- नितीन कंपनी जंक्शन


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानापासून 100 मीटर अंतर मोठ्या प्रमाणात शक्तीप्रदर्शन होणार. इथे देखील jcb च्या साह्याने स्वागत होण्याची शक्यता आहे.
त्यामुळे कायदा सुव्यवस्थेठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त असणार आहे. 


5- ठाणे महापालिका चौक Jcb च्या साह्याने स्वागत. 


6- ठाणे शहरात स्वागत रली


7- मासुंदा तलाव - छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्या कडे हार घालून शक्ती प्रदर्शन होणार.


8- जरांगे पाटील सभा स्थळी


ठिकाण - गडकरी रंगायतन (नौपाडा-पश्चिम)


मंगळवारी सकाळी जरांगे पाटील ठाण्यात येणार आहेत. त्यासाठी मनोज जरांगे-पाटील यांच्या स्वागतार्थ पुष्पवृष्टी करण्यासाठी 25 जेसीबी सोबत ठिकठिकाणी जंगी स्वागत होणार असल्याने या कालावधीत  वाहतुकीचे नियोजन करण्यात आले आहे. आयोजकांमधील कार्यकर्त्यांना आयकार्ड देण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.  सकाळच्या वेळेस सभा असल्यामुळे वाहतूक विभागाने दिलेल्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन वाहतूक विभागाने केलं आहे.


ही बातमी वाचा: