ठाणे : 'सेफेक्सपे (Safexpay) कंपनीचे सॉफ्टवेअर हॅक करून कंपनीला 25 कोटींचा फटका बसल्याची माहिती काही ठिकाणी प्रकाशित झाली होती. त्यावर आता कंपनीने स्पष्टीकरण दिलं आहे. कंपनीचे सॉफ्टवेअर हॅक झाले नसल्याचा दावा कंपनीने केला आहे. तसेच ज्या प्रकरणाचा बातम्यांमध्ये उल्लेख करण्यात आला त्याच्याशी कंपनीशी कोणताही संबंध नसल्याचंही कंपनीने म्हटलं आहे. या संबंधी कंपनीने एक निवेदन प्रसिद्ध केलं आहे. 


काय म्हटलंय कंपनीच्या निवेदनात? 


जून 2023 मध्ये कंपनीच्या पेमेंट गेटवेवर 25 कोटींची संशयास्पद व्यवहार झाल्याचं दिसून आलं. त्यानंतर सेफेक्सपेने (Safexpay) ठाण्यातील श्रीनगर पोलीस ठाण्यामध्ये यासंबंधित तक्रार नोंदवली होती. त्यानंतर या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंद केला. या प्रकरणाचा तपास करताना तपास यंत्रणांना यामध्ये 16 हजार 180 कोटींच्या फसव्या व्यवहारांची माहिती मिळाली. अनेक बँकांतील बनावट खात्यांचा वापर करून हे व्यवहार करण्यात आले असल्याचं दिसून आलं. पण या संपूर्ण प्रकरणाचा सेफेक्सपे कंपनीशी काहीही संबध नाही हेही स्पष्ट झालं. 


या प्रकरणात सायबर क्राईम यंत्रणेला फसव्या व्यवहाराची मालिका असल्याचं दिसून आलं. यामध्ये सेफेक्सपेचा कसलाही संबंध नव्हता. यासंबंधित योग्य आणि स्पष्ट माहिती हवी असल्यास पोलिसांच्या एफआयआरच्या कॉपीमध्ये ती नोंदवली आहे. आम्हचा सर्व व्यवहार हा कायदेशीर मार्गाने झाला आहे आणि त्याचे पुरावेही आमच्याकडे आहेत. हेही लक्षात घेतलं पाहिजे की या प्रकरणातील 16,180 कोटींच्या व्यवहाराचा आणि आमच्या कंपनीचा कोणताही संबंध नाही. तसेच या प्रकरणात नाव आलेल्या कोणत्याही संस्थेसोबत सेफेक्सपेचा कोणताही व्यवहार झालेला नाही. तसेच या प्रकरणातील इतर तक्रारदारांनी आमच्या कंपनीचा कुठेही उल्लेख केलेला नाही. या प्रकरणात तपास यंत्रणांना आमची काही मदत लागल्यास आम्ही सदैव तयार आहे. 


व्यवहारात पारदर्शकता, अखंडता आणि उच्च नैतिक मानक हे सेफेक्सपे कंपनीचे वैशिष्ट्य आहे. आर्थिक व्यवस्थेची स्थिरता आणि विश्वासार्हतेसाठी आम्हची वचनबद्धता कायम राहिल. 


हेही वाचा : 


Kerala Accident : गुगल मॅपनं घात केला, थेट नदीत बुडाली कार; दोन डॉक्टरांचा अपघाती मृत्यू