Thane Kalyan News : कल्याण (Kalyan) शहरातील प्रसिद्ध रामदेव हॉटेल (Ramdev Hotel) पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. काही दिवसांपूर्वी एका ग्राहकाच्या जेवणामध्ये लोखंडाचा तुकडा आढळल्याची घटना ताजी असतानाच, आता पुन्हा एकदा रामदेव हॉटेलमधील फ्राईड राईसमध्ये झुरळ आढळल्याची घटना घडली आहे. ग्राहकांमध्ये या घटनेचा संताप व्यक्त होत आहे.

पोलिसांत तक्रार दाखल करण्यात येणार 

निकिता जाधव या कल्याणच्या रामदेव हॉटेलमध्ये पार्सल घ्यायला गेल्या होत्या. त्यांनी फ्राईड राईस मागवला असता त्यामध्ये झुरळ आढळले. धक्कादायक बाब म्हणजे तो फ्राईड राईस त्यांच्या मुलांनी खाल्ला आहे. मुलांना फ्रुड पॉइझन झाले तर याला जबाबदार कोण? असा सवाल उपस्थित केला आहे. या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात येणार असल्याची माहिती जाधव यांनी दिली आहे. सलग घडणाऱ्या घटनांमुळे रामदेव हॉटेलच्या स्वच्छता व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, ग्राहकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.

महत्वाच्या बातम्या:

Goodluck Cafe : आधी बन मस्कामध्ये काच, आता अंडा भूर्जीमध्ये झुरळ सापडलं; 'गुडलक' कॅफेचे पुन्हा बॅड लक