Thane Rain : ठाणे, मुंबईसह उपनगरात जोरदार (Thane Rain Update) पाऊस पडत आहे. नवी मुंबई,, ठाणे परिसरात विजेच्या कडकडासह पाऊस पडतोय. संध्याकाळी अचानक आलेल्या पावसाने कार्यालयातून घरी जाणाऱ्या नोकरदार वर्गाची चांगली तारांबळ उडाली आहे.   ठाणे शहराला तर पावसाने चांगलेच झोडपले आहे.  संध्याकाळी साडे पाच ते साडे सहा या एक तासात 71 मिमी पावसाची नोंद झाली आहे. ठाण्यात दौलतनगरमध्ये 85.9 मिमी, नौपाडा 84 मिमी, कोपरी 81 मिमी पावसाची नोंद झाली आहे.


मुसळधार पावसानं मध्य रेल्वेची वाहतूक कोलमडली (Mumbai Local)


ठाणे, कळव्यामध्ये सध्या मुसळधार पाऊस आहे. रेल्वे ट्रॅकवर पाणी साचल्याने स सीएसएमटी ते ठाणे आणि दिवा, डोंबिवली, कल्याण या सेक्शन मध्ये लोकल ट्रेन्स उशिराने धावत आहेत. टिटवाळा आणि आंबिवली दरम्यान मालगाडीमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने अर्धा तास कल्याण ते कसारा वाहतूक बंद  होती.  याचा देखील वेळापत्रकावर परिणाम झाला आहे. मुंब्रा कळवा भागात झालेल्या प्रचंड पावसामुळे पारसिक डोंगरावरून पाण्याचे मोठे प्रवाह थेट रेल्वे ट्रॅक वर आले. मध्य रेल्वेच्या ट्रॅक बाजूलाच पारसिकचा डोंगर असल्याने हे पाणी थेट ट्रॅकवर येत होते. पावसाचा जोर जसा कमी झाला तसे पाणी देखील कमी झाले. मात्र यामुळे मध्य रेल्वेच्या तिसऱ्या आणि चौथ्या ट्रॅक वरील वाहतूक 15 ते 20 मिनिटे बंद ठेवण्यात आली होती. पाणी ओसरल्याने ही वाहतूक पुन्हा सुरु करण्यात आली आहे.




 


अंधेरी सबवे वाहतुकीसाठी बंद (Andheri Sub Way Closed)


 अंधेरी, तेली गल्ली अशा विविध भागांमध्ये पाणी साचलं असून अनेक मार्गावर वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. अंधेरी सबवे  वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे तर वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग वापरण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.   गेल्या तासाभरापासून अंधेरीतील तेली गल्ली परिसरात वाहतून कोंडी झाली आहे. वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत.