ठाणे : उल्हासनगरातील (Ulhasnagar Crime) पुजाऱ्याच्या घरी दरोडा (Robbery) टाकून लाखो रुपयांचा ऐवज लूटणाऱ्या दरोडेखोरांना कल्याण क्राईम ब्रॅंच (Kalyam Crime Branch) पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांनी या प्रकरणी चार जणांना अटक केली आहे. या दरोडेखोर टोळीचा म्होरक्या मुंब्रा येथे व्याजाचा धंदा करतो. व्याजावर धंदा करण्यासाठी त्याने ही लूट केल्याचे उघड झाले आहे. 


दरोडेखोरांनी या गुन्ह्यात वापरलेल्या गाडीचा माग काढत पोलिसांनी या सर्वांना अटक केली आहे. अकबर खान, आसिफ शेख, शिवलिंग शिकलकर, राहुल सिंग जुनी अशी आरोपींची नावे आहेत.  


क्राईम बँचकडून आठ तपास पथके 


उल्हासनगरातील (Ulhasnagar Crime) पुजाऱ्याच्या घरी 30 ऑगस्ट रोजी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास दरोडा टाकण्यात आला. दराडेखोरांनी पुजाऱ्याच्या मुलीच्या गळ्यावर हत्यार ठेवत शस्त्राचा धाक दाखवून घरातील लाखो रुपयांचा ऐवज लूटला. या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या दरोडेकरांच्या शोधासाठी कल्याण क्राईम ब्रॅंचची (Kalyam Crime Branch) आठ तपास पथके नेमण्यात आली. अखेर या दरोडेखोरांना पकडण्यात कल्याण क्राईम ब्रँचला यश आले आहे. 


गाडीचा माग काढत आरोपींना अटक 


या दरोड्यात आरोपींनी जी गाडी वापरली होती, ती गाडी कळंबोळी येथून चोरी करण्यात आली होती. पोलिसांनी सीसीटीव्हीमध्ये (CCTV) या गाडीची माहिती काढली असता ही गाडी अंबरनाथच्या पालेगावात ठेवण्यात आल्याची माहिती मिळाली. दरोडेखोर पालेगावातून दुसऱ्या गाडीने पसार झाले. गुन्हा घडल्यानंतर एक गाडी सीसीटीव्हीत आढळून आली होती. या गाडीच्या सहाय्याने क्राईम ब्रँचची टीम आरोपींपर्यंत पोहचली. 


या प्रकरणी चार दरोडेखोरांना जेरबंद करण्यात आले आहे. यातील मुंब्रा येथे राहणारा अकबर खान हा व्याजावर पैसे देण्याचा धंदा करतो. या धंद्यासाठी त्याने हा दरोडा टाकल्याचे समोर आाले आहे. यातील अन्य आरोपींची नावे आसिफ शेख, शिवलिंग शिकलकर, राहुल सिंग जुनी अशी आहेत. आसिफ हा मुंब्रा येथे राहणारा आहे. अन्य दोन जण हे कल्याण डोंबिवलीत राहत होते. या आरोपींना विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या हवाली सूपूर्द करण्याची प्रक्रिया सुरु आहे.


महत्त्वाच्या बातम्या: