Bhiwandi : भिवंडीकरांची आजच्या दिवसाची सुरुवात झाली ती भीषण आगीने. शहरातील खोका कंपाउंड परिसरात एका ऑइल गोडाऊनला भीषण आग लागल्याची घटना घडली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली. तर रस्त्याच्या दुभाजकाला केमिकल टँकर जोरदार आदळल्याने ज्वलनशील केमिकलने भरलेला टँकर रस्त्या किनारी असलेल्या वाहनांना तुडवत पलटी झाला. तर दुसरीकडे एका अवैध भंगार गोदामात केमिकलचा वापर करून पिशव्या धुतले जात होते, मात्र बिडी ओढण्याचा नशेमुळे केमिकल ड्रमचा मोठा स्फोट झाला. यामध्ये भंगार मालकासह कामगार असे दोघांचे जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
पहाटेच्या सुमारास भिवंडी शहरातील खोका कंपाउंड परिसरात एका ऑइल गोडाऊनला भीषण आग लागल्याची घटना घडली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली, ही आग इतकी भीषण होती की परिसरात आगीचे लोळ व धूर मोठ्या प्रमाणात पसरले होते. तात्काळ वीज पुरवठा देखील खंडित करण्यात आली व या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी भिवंडी अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. या आगीवर तब्बल चार तासानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी यश मिळवले. मात्र या आगीचे कारण अजूनही अस्पष्ट असून सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाहीये.
दिवस उजाडलाचा होता की भिवंडी शहरातील नदी नाका परिसरात एपीजे अब्दुल कलाम उड्डान पुलावरून खाली उतरताना मुंबईहून वाड्याच्या दिशेने जात असताना ज्वलन सिल केमिकलने भरलेला टँकर दुभाजकाला आदळून पलटी झाला. यादरम्यान रस्त्या किनारी उभं असलेल्या पाच ते सहा दुचाकी व एका रिक्षाला टँकरची धडक लागल्याने वाहनांचे नुकसान झाले. शिवाय टँकरमधून ज्वलनशील केमिकलची गळती सुरू झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. हा केमिकल इतका भीषण होता की दुचाकी वरील कलर अक्षरशः जळून निघाला. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या दोन गाड्या दाखल झाल्या. निजामपूर पोलीस ठाण्याचे पोलीस देखील दाखल झाले. सध्या हा केमिकल कोणता आहे याचे अनुमान लावले जात आहे, परंतु हा केमिकल अतिशय ज्वलनशील असल्याचे निदर्शनात येत आहे. गळती सुरू झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण देखील पसरले आहे. या ठिकाणी घडलेली ही पहिली घटना नाही, याआधी देखील अनेक टँकर आणि कंटेनर पलटी झाल्याची घटना घडली आहे. सुदैवाने यामध्ये अजूनपर्यंत तर कोणतीही जीवित हानी झाली नाही.
केमिकल ड्रमचा भीषण स्फोट झाल्याची घटना भिवंडी शहरालगत असलेल्या कांबा ग्रामपंचायत हद्दीतील तळवळी नाका भागातील घरत कंपाउंड मधील भंगार गोदामात घडली. उघड्यावर असलेल्या भंगार गोदामात केमिकलचा वापर करून पिशव्या धुण्याचे काम आज सकळाच्या सुमारास दोघे मृतक करीत होते. त्यातच एका कामगाराला बिडी ओढण्याची तलप लागल्याने त्याने बिडी पेटवत बिडी पिण्यास सुरुवात केली. मात्र बिडीची ठिणगी केमीकल ड्रमच्या संपर्कात आल्याने केमीकल ड्रामचा मोठा स्फोट झाला. केमिकल ड्रमचा स्फोटात दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली, या दुर्घटनेत रमजान कुरेशी (वय 46) भंगार मालक व ईशराईल शेख (वय 35) कामगार असे जागीच ठार झाल्याची नावे आहेत. स्फोट इतका भीषण होता की आजूबाजूच्या इमारतींचे खिडकीचे काचादेखील फुटल्या आहेत. स्फोट इतका भीषण होता की दोन्ही कामगारांचा मृतदेह 50 ते 60 फूट हवेत उडून दूरवर फेकले गेले होते. भंगार गोदामाला देखील आग लागली होती, या आगीवर भिवंडी अग्निशमन दलाने नियंत्रण मिळवले असून घटनास्थळी भिवंडी निजामपूर पोलिस दाखल असून पोलीस पंचनामा करीत आहेत. तर मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदन करता स्वर्गीय इंदिरा गांधी मेमोरियल रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.