Shrikant Shinde: मुख्यमंत्री स्वतः या ठाणे जिल्ह्याचे आहे..मुख्यमंत्री शिंदे यांनी जिल्ह्याचा मास्टर प्लॅन हाती घेतला आहे, असे खासदार श्रीकांत शिंदे यांनी सांगितलं. कल्याणमध्ये सुभेदार वाडा कट्टा व कल्याण विकास फाउंडेशनच्या वतीने तीन दिवसीय प्रा. रामभाऊ कापसे स्मृती व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास आज खासदार श्रीकांत शिंदे उपस्थित होते. ‘कल्याण-डोंबिवली विकासाच्या नकाशावर’ यावर खासदार शिंदे यांनी आपले मत मांडले. यावेळी बोलताना खासदार श्रीकांत शिंदे यांनी कल्याण डोंबिवली विकासाच्या वाटेवर या विषयातून सकारात्मक प्रवास सुरू झाला आहे असे सांगितले. कल्याण ,डोंबिवली, उल्हासनगर,अंबरनाथ, बदलापूर ,शहरांच्या सुरू असलेल्या विकासाबाबत माहिती दिली.
मुख्यमंत्री शिंदे यांनी जिल्ह्याचा मास्टर प्लॅन हाती घेतला आहे - खासदार श्रीकांत शिंदे
मुख्यमंत्री स्वतः या ठाणे जिल्ह्याचे आहे..मुख्यमंत्री शिंदे यांनी जिल्ह्याचा मास्टर प्लॅन हाती घेतला आहे. एम एम आर रिजन मधील शहरांसाठी पुढील 15 ते 20 वर्षाचा विचार डोळ्यासमोर समोर ठेवत जिल्ह्याचा कायापालट करायचा आहे. नियमावर बोट ठेवून काम करत राहिलो तर आपण लोकांच्या जगण्यामध्ये काही बदल करू शकत नाही..मात्र नियमांमध्ये सुधार केला तर प्रत्येकाच्या जगण्यात फरक घडू शकतो. हे सरकार गेल्या सहा महिन्यात लोकांसाठी निर्णय घेतेय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिवस रात्र काम करत आहेत. या सरकारला सुपरफास्ट सरकार म्हणतात सुपरफास्ट निर्णय घेण्याची त्यांना आता सवय झाली ..कोणत्याच निर्णय पेंडिंग ठेवला नाही.. प्रत्येक थरातील व्यक्तींसाठी निर्णय घेण्याचे काम हे सरकार करते..हे सरकार आल्यापासून अनेक निर्णय घेतले.आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईचा सुशोभीकरण हाती घेतले. मुंबईचा शांघाय करू शकत नाही मात्र मुंबईची मुंबई ठेवू शकतो ..तेच एम एम आर रिजन मध्ये राबवणार आहोत. मुंबई उपनगर देखील शहर स्वच्छ राहिली पाहिजेत अशी माहिती खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिली
आजच्या युगात स्वतः केलेलं काम स्वतःला सांगायला लागतं तेव्हा ते सगळ्या पर्यंत पोहचतात - श्रीकांत शिंदे
आपल्याला सगळ्यांना वाटेल की हा काय स्वतः केलेलं काम सांगतोय. आजच्या युगात स्वतः केलेलं काम स्वतःला सांगायला लागत. तेव्हा ते सगळ्या पर्यंत पोहचतात,जितकं आपल्याला कळलं जितकी क्षमता होती ती कामे गेल्या आठ वर्षांत केली आणि पुढे ही करणार. मुंबई आणि ठाण्याच्या धर्तीवर कल्याण डोंबिवली अंबरनाथ बदलापूर शहराचा विकास करू असे सांगितले