Shrikant Shinde Thane News : जागतिक पातळीवर प्रसिद्ध असलेल्या ठाण्यातील भवानी चौकातील नवरात्रौत्सवात (Navratri 2023) जन्मभूमी श्रीराम मंदिर (अयोध्या) लोकार्पण महापर्वाची पूर्वसंध्या म्हणून दुर्गदुर्गेश्वरीचा दरबार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रती श्रीराम मंदिर स्वरुपात भाविकांना अनुभवयास मिळणार आहे अशी माहिती खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली.


श्रीराम मंदिराची प्रतिकृती साकारण्यात येणार


ठाण्यातील टेंभीनाका येथील नवरात्रौत्सव जगातील अनेक देशात प्रसिद्ध आहे. धर्मवीर आनंद दिघे यांनी जय अंबे माँ सार्वजनिक धर्मादाय विश्वस्त संस्थेच्या माध्यमातून सुरु केलेल्या या नवरात्रौत्सवाचा नावलौकिक दिवसेंदिवस वाढतच आहे. आनंद दिघे यांच्यानंतर विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही परंपरा आजतागायत त्याच उत्साहात सुरू ठेवली. टेंभीनाका येथील दुर्गेश्वरीच्या दर्शनासाठी तसेच येथील देखावा पाहण्यासाठी अनेक राज्यातील देवीभक्त दरवर्षी येत असतात. भव्य दिव्य आरास हे या उत्सवाचे खास वैशिष्ट्य आहे. यावर्षी श्रीराम मंदिर लोकार्पण सोहळयाच्या पूर्वसंध्येचे औचित्य साधून श्रीराम मंदिराची प्रतिकृती साकारण्यात येणार आहे. नागर शैलीवर आधारीत हे मंदिर पूर्णपणे फायबर ग्लास, स्टील, लाकडी फळ्या, ऑईल पेंट इत्यादी सामुग्रीचा प्रामुख्याने यामध्ये वापर करण्यात येणार आहे.


सदर मंदिराची आरास सुप्रसिद्ध कलादिग्दर्शक अमन विधाटे साकारत असून मंदिर उभारण्यासाठी पुणे, कराड, शहापूर, भांडूप, जोगेश्वरी आणि टेंभीनाका ठाणे अशा सहा ठिकाणी काम सुरु असून, अंदाजे 350 कुशल तर अनेक अकुशल कामगार अहोरात्र काम करत आहेत. 


मंदिराचा मुख्य गाभारा 40 x 40 फुट इतक्या मोजमापाचा असून, त्याची उंची फूट आहे. छताचा आतील भाग नक्षीकामाने नटलेल्या छत्री आकाराचा आहे. यामध्ये दशावतार सोबतच विठूमाऊली आणि सत्यनारायणाचे भाविकांना दर्शन होणार आहे. 


यामध्ये संपूर्ण कारविंग असलेले 40 x 60 फुटाचे छत असून, एकूण 32 छोटे-मीठे कोरीव खांब या मंदिराचा डोलारा उलचून धरणार आहेत. तर 64 कोरीव कमानी एकंदरीत गाभाऱ्याची व सभामंडपाची आकर्षक मुर्त्यासह मंडपाची शोभा वाढविणार आहेत. माँ दुर्गेचे मखर पूर्णपणे असून, त्याची उंची 14 फूट तर 14 फूट लांबी आणि 10 फूट रुंद आहे. मंदिराची शोभा वाढविण्यासाठी नक्षीकाम असलेल्या कार्पेट सोबतच झुंबर आणि आकर्षक रोषणाई करण्यात येणार आहे..


धर्मवीर आनंद दिघे यांनी सुरु केलेली नवरात्रोत्सवाची परंपरा चालू राहावी यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिवसैनिक काम करीत आहेत. 


महत्त्वाच्या बातम्या : 


Aaditya Thackeray : सुप्रीम कोर्टाने राहुल नार्वेकरांना झापलं, आता आदित्य ठाकरेंनी दोन प्रकरणांवरुन सरकारला घेरलं!