ठाणे : रस्त्यावर थुंकू नको असं सांगितल्यानंतर एका परप्रांतीय चालकाने वृद्धाला मारहाण केल्याची घटना ठाण्यात घडली होती. मारहाण झालेला वृद्ध व्यक्ती हा गंभीर असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्या वृद्धाशी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी संवाद साधला. यावेळी राज ठाकरे यांनी त्यांची आपुलकीने विचारपूस केली आणि काही लागल्यास सांगा असंही म्हणाले. 

Continues below advertisement

ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयाबाहेर रस्त्यावर थुंकल्याचा जाब विचारल्यामुळे वयोवृद्ध व्यक्तीला एका परप्रांतीय कॅब चालकाने मारहाण केली होती. या मारहाणीत त्या वृद्ध व्यक्तीचा पाय फ्रॅक्चर झाला होता. त्यामुळे त्याच्यावर आता रुग्णालयात सर्जरी करण्यात आली आहे. 

ठाण्यातील मनसे नेते अविनाश जाधव यांनी रुग्णालयात भेट देऊन त्या वृद्धाच्या तब्येतीची चौकशी केली. त्यानंतर त्यांनी राज ठाकरे यांना फोन लावला. त्यावेळी राज ठाकरे यांनी त्या वृद्धाशी संवाद साधला. आपण कसे आहात? पाय कसा आहे? अशी विचारपूस राज ठाकरे यांनी केली. यापुढे काही लागल्यास नक्की सांगा, असं म्हणत राज ठाकरे यांनी त्या वृद्ध दाम्पत्यास मदतीचं आश्वासन दिलं. 

Continues below advertisement

Thane Assault Case : नेमकं काय घडलं होतं?

ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयाजवळून एक वयोवृद्ध दाम्पत्य पायी जात असताना कॅब चालक निशांत शुक्ला हा त्यांच्यासमोर रस्त्यावर थुंकला. त्यावर वृद्धाने त्याला 'रस्त्यात थुंकू नकोस' एवढाच समजुतीचा सल्ला दिला. मात्र, याचा राग मनात धरून या मुजोर चालकाने थेट हातात दगड घेऊन वयोवृद्धावर हल्ला चढवला. या जीवघेण्या मारहाणीत वयोवृद्ध गृहस्थ रस्त्यावर कोसळले. या मुजोर चालकाच्या मारहाणीमध्ये त्या वृद्धाचा पाय फ्रॅक्चर झाला.

मारहाणीच्या या घटनेचा व्हिडीओ समोर येताच दोन्ही शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी तातडीने हालचाल करत संबंधित परप्रांतीय चालकाला शोधून काढलं आणि त्याला चांगलाच चोप देऊन वर्तकनगर पोलिसांच्या स्वाधीन केलं.

Thane Cab Driver Arrested :  मुजोर कॅब चालकाला दोन दिवसांची पोलीस कोठडी

ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयाबाहेर रस्त्यावर थुंकल्याचा जाब विचारल्यामुळे वयोवृद्ध व्यक्तीला बेदम मारहाण करणाऱ्या मुजोर परप्रांतीय कॅब चालकाविरोधात कारवाई करण्यात आली आहे. अखेर 14 तासांच्या प्रतीक्षेनंतर वर्तकनगर पोलीस ठाण्यात त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातून संतापाची लाट उसळली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या मुजोर कॅब चालकाचे नाव निशांत धर शुक्ला असं आहे. मारहाण झालेले वयोवृद्ध दाम्पत्य प्रचंड घाबरल्यामुळे किंवा इतर कारणांमुळे स्वतःहून पोलिसांत तक्रार देण्यासाठी पुढे येत नव्हते. त्यामुळे शिवसेना कार्यकर्ते नितेश पाटोळे यांनी स्वतः या प्रकरणात फिर्यादी बनून पोलिसांत रीतसर गुन्हा दाखल केला आहे.

Thane Cab Driver Legal Action : 'या' कलमांन्वये गुन्हा दाखल

या प्रकरणाची भीषणता पाहून राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे पोलीस आयुक्तांना थेट फोन करून कडक कारवाईचे आदेश दिले होते. त्यानुसार वर्तकनगर पोलिसांनी आरोपी निशांत शुक्ला याच्यावर भारतीय न्याय संहितेच्या (BNS) खालील कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे:

BNS कलम 109 : हत्येचा प्रयत्न करणे (Attempt to Murder - जुने आयपीसी कलम 307).

BNS कलम 352 : शांतता भंग करण्याच्या उद्देशाने हेतुपुरस्सर अपमान किंवा कृत्य करणे.

ही बातमी वाचा: