Kalyan Dombivli Water Cut: संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर कल्याण-डोंबिवलीकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. भारतीय हवामान खात्याने यंदा अल निनो (El Niño) आणि आयओडी (आयओडी ) च्या प्रभावामुळे पावसाळा लांबण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे भविष्यात पाण्याची कमतरता भासू नये यासाठी जलसंपदा विभागाने सर्व महानगरपालिका आणि संबंधित प्राधिकरणांना दररोज 20 टक्के पाणी कपात करण्याचे निर्देश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवली महानगरपालिका प्रशासनाने बारावे, मोहिली आणि नेतिवली जलशुद्धीकरण केंद्रांतून होणारा पाणीपुरवठा नियोजित पद्धतीने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे शहरातील अनेक भागांमध्ये नागरिकांना काही काळ गैरसोय सहन करावी लागणार आहे. मान्सून सध्या कोकणात दाखल झाला आहे. मुंबईत मान्सूनचे आगमन होण्यासाठी आणखी काही काळ लागणार आहे. मात्र, पाणी कपातीचे संपूर्ण गणित पुढील काळात किती पाऊस पडतो, यावर अवलंबून आहे. (Kalyan Dombivli News)

Dombivli News:  कोणत्या दिवशी कुठे पाणीपुरवठा बंद?

12 जून व 17 जून

नेतिवली जलशुद्धीकरण केंद्रातून पुरवठा होणाऱ्या डोंबिवली (पूर्व) येथील 'फ' व 'ग' प्रभागात 24 तास पाणीपुरवठा बंद राहणार.

13 जून व 18 जून

बारावे जलशुद्धीकरण केंद्रातून पुरवठा होणाऱ्या कल्याण (पूर्व) येथील 'ड' व 'जे' प्रभाग, तसेच कल्याण (पश्चिम) मधील गोदरेज हिल, पारनाका आणि सुभाष मैदान परिसर बाधित राहणार.

14 जून व 19 जून

डोंबिवली (पश्चिम) येथील 'ह' प्रभागात पाणीपुरवठा बंद राहील.

15 जून व 20 जून

कल्याण (पश्चिम) मधील 'ब' व 'क' प्रभागातील नागरिकांना पाणीपुरवठा बंदचा फटका बसणार.

16 जून व 21 जून

मोहिली जलशुद्धीकरण केंद्रातून पुरवठा होणाऱ्या मांडा-टिटवाळा, वडवली, आंबिवली, शहाड, अटाळी तसेच कल्याण ग्रामीण भागातील गावे, योगिधाम, मिलिंद नगर, बिर्ला कॉलेज, चिकनघर, मुरबाड रोड आणि वालधुनी परिसरात 24 तास पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

KDMC News: प्रशासनाकडून नागरिकांना महत्त्वाचे आवाहन

महानगरपालिकेने नागरिकांना आवश्यक तेवढाच पाणीसाठा करून पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन केले आहे. संबंधित भागांमध्ये पाणीपुरवठा रात्री 12 वाजल्यापासून पुढील 24 तास पूर्णपणे बंद राहणार असल्याने नागरिकांनी योग्य नियोजन करावे, असे आवाहन केडीएमसी प्रशासनाने केले आहे. पावसाळा उशिरा येण्याची शक्यता आणि जलसाठ्यावरील वाढता ताण लक्षात घेता, ही पाणी कपात पुढील काळात अधिक महत्त्वाची ठरणार आहे.

आणखी वाचा

Maharashtra Rain Updates: वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळणार; मुंबई, पुणे, ठाणे आणि कोकणासह 30 जिल्ह्यांना आज यलो अलर्ट, मान्सूनचे A टू Z अपडेट्स