Jitendra Awhad Viral Audio Clip: राष्ट्रवादीचे (NCP) नेते, माजी गृनिर्माण मंत्री, आमदार जितेंद्र आव्हाड यांनी महापालिकेच्या कळवा प्रभाग समितीचे सहायक आयुक्त सुबोध ठाणेकर यांच्यासोबतच्या संभाषणाची एक ऑडिओ क्लिप व्हायरल केली आहे. त्यात कळव्यात 29 बेकायदा बांधकामे सुरू असल्याचा आरोप आव्हाड यांनी केला आहे. बांधकामे उभी करण्यासाठी तुम्ही पैस घेता आणि पाडताना माझे नाव लोकांना सांगता. एका बांधकामांसाठी तुम्ही पैसे घेतले आहेत, असा आरोप करत, कोणामार्फत पैसे घेतले, ते उघडकीस करणार असल्याचे आव्हाड यांनी संभाषण क्लिप मध्ये बोलताना दिसत आहे.
Jitendra Awhad Viral Audio Clip: ऑडिओ क्लिपमध्ये काय म्हणाले आव्हाड?
समोर आलेल्या ऑडिओ क्लिपमध्ये आव्हाड हे सुबोध ठाणेकर याना म्हणतात की, ''रोहितदास पाटीलला काय सांगितलं की मी, जितेंद्र आव्हाडांनी सांगितलं कारवाई करायला.''
सहायक आयुक्त सुबोध ठाणेकर: ''नाही सर.
आव्हाड: ''मला स्वतः रोहिदास पाटलांनी सांगितलं की तुम्ही त्यांना सांगितलं की, मी सांगितलं कारवाई करायला.''
सहायक आयुक्त सुबोध ठाणेकर: ''नाही.''
आव्हाड: ''रोहितदास पाटलांच्या बिल्डिंगच्या बाजूला तुम्हाला इतर बिल्डिंग दिसल्या नाही, अनधिकृत...''
सहायक आयुक्त सुबोध ठाणेकर: हो सर त्यांच्यावरही कारवाई केली.
आव्हाड: काय केली?
सहायक आयुक्त सुबोध ठाणेकर: ''आज आज सर रोहित पाटलांवरच केली आहे.''
आव्हाड: आता पुढे काय करणार तुम्ही?
सहायक आयुक्त सुबोध ठाणेकर: नाही सर पहिले तेच टार्गेट केलं आहे, नवीन बांधकाम सुरूच करू द्यायचं नाही.
आव्हाड : ते ठीक आहे, पण जे झालंय ग्राऊंड प्लस सेव्हन त्याला बघू पण नका म्हणजे ते पूर्ण करून पैसे कमवतील
सहायक आयुक्त सुबोध ठाणेकर: नाही सर तसं नाही आहे.
आव्हाड : अरे तुम्ही रोहिदास पाटलांकडून 20 लाख रुपये घेतले.
सहायक आयुक्त सुबोध ठाणेकर: सर आता हे काही आरोप करत आहात.
आव्हाड : काही आरोप करतायत, देणाऱ्या माणसाला उभा करू का समोर...तुम्ही कोणाच्या हातातून पैसे घेतले माहित आहे का तुम्हाला.. लोकांना वेडे समजलात का..जरा आवरतं घ्या.
दरम्यान, या व्हायरल ऑडिओ क्लिपवर आज पत्रकार परिषद घेत आव्हाड म्हणाले आहेत की, एकाच्या मागे उभं राहायचं त्याच्या आठ मजल्याच्या इमारती होऊ द्यायच्या. आमच्या कार्यकर्त्यांच्या इमारती होत असतील, त्या तोडायच्या आणि सांगायचं जितेंद्र आव्हाड यांनी तोडायला सांगितलं आहे. ते सगळं बंद करा, असं मी आयुक्तांना दहा वेळा सांगितलं आहे. ते म्हणाले, विटाव्याचे मला वाईट हे वाटत की, उद्या जर ती बल्डींग ढासळली, तर कमीत-कमी 200 लोकांचा मृत्यू होऊ शकतो. ते म्हणाले, यात सरळ अधिकाऱ्यांचा हात असून त्यांचा भाव ठरलेला आहे. याबाबत अनेकवेळा सांगूनही काही होत नाही.