Mumbai local Train News : मुंबईमध्ये धावत्या लोकल ट्रेनमध्ये एका दिव्यांग (मूकबधिर ) व्यक्तीला जाळण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नशेसाठी वापरणाऱ्या सोल्युशनने दिव्यांगला जाळण्याचा प्रयत्न केला. यामध्ये तरुण गंभीर जखमी झाला असून उपचारासाठी त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याण रेल्वेत शनिवारी रात्री 11 वाजताच्या सुमारास कळवा-मुंब्रा स्थानकादरम्यान घटना घडली ही धक्कादायक घटना घडली. 


नशेसाठी वापरण्यात येणारे सोल्युशन हातावर टाकून दिव्यांगाला पेटवून दिले. यामध्ये त्याचा हात पूर्णपणे भाजला आहे. त्याचे नाव प्रमोद वाडेकर असे आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याण रेल्वेत कळवा-मुंब्रा स्थानकादरम्यान घटना घडली शनिवारी रात्री 11 वाजता ही धक्कादायक घटना घडली आहे. 35 वर्षीय वाडेकर  यांचा डावा हात संपूर्णपणे होरपळला आहे. जखमीवर केईएममध्ये उपचार सुरू आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, हल्ला करणाराही दिव्यांग असून हल्ल्यानंतर मुंब्रा स्थानकात उतरून गेल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.  


छत्रपती शिवाजी महाराज स्थानकावरून कल्याणला जाणाऱ्या लोकलमध्ये मूकबधिर  प्रमोद वाडेकरवर ज्वलनशील पदार्थ टाकून जाळण्याचा प्रयत्न केला. प्रमोद हा मुंबईतील एका हॉटेलमध्ये काम करतो. कामावरून लोकलने दिवामधील आपल्या घरी परतत असताना मुंब्रा स्टेशनजवळ विकलांग डब्यामध्ये एका अज्ञात इसमाने प्रमोदच्या अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकून त्याला जाळण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली. जखमी प्रमोदवर मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरू आहेत, मात्र पोलिसांनी गुन्हा दाखल केला नसल्याची माहिती प्रमोद वाडेकर यांचा भाऊ प्रसाद वाडेकर यांनी दिली आहे. 


सीएसएमटी स्टेशनवर हाय व्होल्टेज ड्रामा 


मुंबईमधील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल रेल्वे स्टेशनवर (Chhatrapati Sambhaji Maharaj Terminus) शनिवारी रात्री हाय व्होल्टेज ड्रामा झाला होता. संध्याकाळी ऐन गर्दीच्यावेळी एक व्यक्ती चक्क रेल्वे स्टेशनवर असलेला लोखंडी खांबावर चढला होता. खांबावर चढल्यानंतर हा व्यक्ती आत्महत्या करण्याची धमकी देत होता, असं सांगण्यात येत आहे. हा व्यक्ती जेव्हा लोखंडी खांबावर चढला होता, तेव्हा त्याला बघण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती. या घटनेचा व्हिडीओ (Viral Video) देखील समोर आला आहे.  मिळालेल्या माहितीनुसार, हा व्यक्ती मानसिक रुग्ण असल्याचं बोललं जात आहे. सीएसएमटी रेल्वे स्थानकाच्या (Csmt Railway Station) प्लॅटफॉर्म 9 वर ओव्हरहेड वायरच्या खांबावर हा व्यक्ती चढला होता. यावेळी त्याने आत्महत्या करणार असल्याची धमकी दिली.