Mumbai Local Megablock: मुंबईकरांच्या सेवेसाठी असणाऱ्या लोकल रेल्वे मार्गावर रविवारी (25 जून) रोजी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. रेल्वेच्या मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर (Central Railway Main Line) आणि हार्बर (Harbour) मार्गावर मेगाब्लॉक (Megablock) घेण्यात येणार असल्याचं रेल्वेकडून सांगण्यात येत आहे.  त्यामुळे नागरिकांनी रेल्वेचे वेळापत्रक बघूनच बाहेर पडावे असं आवाहन रेल्वेमार्फत करण्यात येत आहे. देखभालीच्या आणि दुरुस्तीच्या कामांसाठी रेल्वेच्या मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार असल्याचं रेल्वेकडून सांगितलं गेलं आहे. मध्य रेल्वेच्या माटुंगा ते मुलुंड या स्थानकादरम्यान अप आणि डाऊन धीम्या मर्गावर सकाळी 11.05 ते दुपारी 3.55 वाजण्याच्या दरम्यान मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. 


दरम्यान  छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटणाऱ्या लोकलची वाहतूक माटुंगा ते मुलुंडदरम्यानची धीम्या मार्गावरील सेवा जलद मार्गावर वळवण्यात येईल. तसेच या वेळेत लोकल शीव, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप आणि मुलुंड स्थानकांवर  थांबणार आहेत. पुढे मुलुंड स्थानकावर ही वाहतूक पुन्हा धीम्या मार्गावर वळवण्यात येईल. तसेच या मार्गावरील वाहतूक ही 15 मिनिटे उशीराने धावणार आहे. तर ठाण्यावरुन सुटणाऱ्या लोकल या सकाळी 10.58 ते दुपारी 3.59 या दरम्यान मुलुंड आणि  माटुंगा दरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येईल. तसेच या लोकल यादरम्यान लुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला आणि शीव स्थानकावर थांबतील. या मार्गावरील वाहतूक देखील 15 मिनिटे उशीराने असणार आहे. 


हार्बर मार्गावर देखील मेगाब्लॉक 


हार्बर मार्गावर कुर्ला ते वाशी दरम्यान अप आणि डाऊन मार्गावर सकाळी 11.10 ते दुपारी 4.10 पर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. पनवेल ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस पर्यंत अप आणि डाऊन मार्गावर सकाळी 10.16 ते दुपारी  3.47 वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. तर  छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते पनवेल अप आणि डाऊन हार्बर मार्गावर सकाळी 10.34 ते दुपारी 03.36 वाजेपर्यंत सेवा रद्द करण्यात आलेल्या आहेत. तसेच या ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कुर्ला आणि पनवेल ते वाशीदरम्यान विशेष लोकल चालवण्यात येणार आहे. मात्र नेरुळ ते खारकोपर सेवेवर मेगाब्लॉगचा कोणताही परिणाम होणार नाही.  पायाभूत सुविधांच्या देखभाल आणि सुरक्षिततेसाठी हा ब्लॉग घेण्यात आल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलं असून प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल दिलगिरी देखील व्यक्त करण्यात आली आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :


MHADA Lottery 2023 Mumbai : 'म्हाडा' मुंबई मंडळ सोडत 2023 साठी अर्ज करण्याची मुदत वाढली; थेट 10 जुलैपर्यंत मुदतवाढ