Continues below advertisement

ठाणे : अपक्ष आमदार शिवाजी पाटील (Shivaji Patil) यांना हनी ट्रॅपच्या (Honey Trap) माध्यमातून अडकवण्याच्या प्रयत्न करणाऱ्या बहीण भावास अटक करण्यात आली आहे. ठाणे पोलिसांनी कोल्हापुरातील चंदगडमध्ये जाऊन ही अटक केली. हनी ट्रॅप प्रकरणी आमदार शिवाजी पाटील यांनी ठाण्यातील चितळसर मानपाडा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली होती. आर्थिक कमाईच्या हेतूने हा हनी ट्रॅपचा प्रयत्न करण्यात आला आहे का याचा तपास आता पोलीस करत आहेत.

शिवाजी पाटील हे कोल्हापुरातील चंदगड विधानसभेचे अपक्ष आमदार आहेत. तसेच ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. दोन दिवसांपूर्वी त्यांनी ठाण्यातील पोलीस स्टेशनमध्ये हनी ट्रॅपची तक्रार केली होती. त्यानंतर पोलिसांनी जलदगतीने पावले उचलून चंदगडमधून एका भावा-बहिणीस अटक केली आहे.

Continues below advertisement

MLA Shivaji Patil Honey Trap Case : प्रकरण नेमकं काय?

आमदार शिवाजी पाटील यांना मोबाइलवर अश्लील संदेश आणि फोटो पाठवून हनी ट्रॅपमध्ये अडकवण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला. या प्रकरणी शिवाजी पाटील यांनी ठाण्यातील (Thane) चितळसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

MLA Honey Trap Case : अज्ञात महिलेने अश्लील फोटो पाठवले

पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, एका अनोळखी महिलेने गेल्या वर्षभरात वेगवेगळ्या मोबाइल नंबरवरून आमदार पाटील यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीला साध्या चॅटिंगने संवाद सुरू झाला, त्यानंतर त्या महिलेने पाटील यांच्याशी मैत्री करण्याची इच्छा व्यक्त केली. हळूहळू संवाद वाढत गेल्यानंतर तिने काही तरुणींचे अश्लील फोटो पाठवण्यास सुरुवात केली.

Shivaji Patil Case: दहा लाख द्या नाहीतर...

या महिलेने सुरुवातीला एक लाख, नंतर दोन लाख आणि अखेर पाच लाख अशा हप्त्यांमध्ये एकूण 10 लाख रुपयांची मागणी केली. काही काळानंतर पाटील यांनी महिलेचा त्रास वाढल्यामुळे त्या महिलेला ब्लॉक केले. मात्र, विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान तिने दुसऱ्या मोबाइल क्रमांकावरून पुन्हा संपर्क साधत अश्लील फोटो आणि संदेश पाठवले. पैसे न दिल्यास पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करून राजकीय प्रतिमा मलन करण्याची धमकीही तिने दिली.

Shivaji Patil News: चितळसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

या प्रकारामुळे त्रस्त झालेल्या आमदार पाटील यांनी 8 ऑक्टोबर रोजी चितळसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी सदर प्रकरणात आयटी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला असून, प्राथमिक तपासात हा सायबर हनी ट्रॅपचा प्रकार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

पोलिसांनी सायबर सेलच्या मदतीने तांत्रिक तपास सुरू केला आणि चंदगडमधून दोघांना अटक केली. या प्रकरणात आर्थिक कमाईच्या हेतूने की आणखी काही कारणामुळे हनी ट्रॅपचा प्रयत्न करण्यात आला याचा तपास ठाणे पोलीस करत आहेत.

ही बातमी वाचा: