Uddhav Thackeray : मला पाश्चाताप आता होत आहे, तेव्हा अनंत तरे यांचे ऐकले असते तर अमित शाह समोर वाचवा म्हणून घालीन लोटांगण घालणारे  दिसले नसते असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली. 2014 साली जेव्हा भाजपने अचानक साथ सोडली तेव्हा अनंत तरे हे ऐकायला तयार नव्हते. अपक्ष उमेदवारी भरली होती, त्यावेळी मी त्यांना मातोश्रीवर बोलावले होते. त्यांना मी सांगितले होते की भाजप आपल्याला संपवायला निघाले आहेत, आधी त्यांना रोखू मग आपण पुढे जाऊ. पण तेव्हा तरे म्हणाले होते की हा माणूस पुढे गद्दारी करणार आणि पुढे तेच झाले असे उद्धव ठाकरे म्हणाले. 

Continues below advertisement

दिवंगत अनंत तरे यांच्या जीवनावर आधारित अनंत आकाश या पुस्तकाचे प्रकाशन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलेत होते. यावेळी खासदार अरविंद सावंत, खासदार संजय पाटील, खासदार सुरेश म्हात्रे उपस्थित होते. 

आताचे ठाणे कॉन्ट्रॅक्टरचे ठाणे झाले आहे. 

 वेळेत पोहोचलो मुंबईतून ठाण्यात वेगाने आलो, पण ठाण्यात वेग मंदावला वेग मंदावणारा कोणी जन्माला आला नाही वाहतूककोंडी मुळे वेग मंदावल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. तेव्हाचे ठाणे आनंद देणारे ठाणे होते आताचे ठाणे कॉन्ट्रॅक्टरचे ठाणे झाले आहे. याच्या विरोधात सोमवारी मोर्चा आहे. निष्ठेचे मुखवटे घातलेले लोक आपल्या बाजूला बसतात. मला पाश्चाताप होत आहे तेव्हा अनंत तरे यांचे ऐकले असते तर अमित शाह समोर वाचवा म्हणून घालीन लोटांगण घालणारे आज दिसले नसते असे म्हणत ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना टोला लगावला. शिवसेना भाजप युती ठरली होती अर्ज भरायच्या शेवटच्या दिवशी युती तुटली तेव्हाच भाजपचा शिवसेना तोडायचा डाव होता असे ठाकरे म्हणाले. तरे यांच्या सोबत बोललो, तरे बोलले हा एकदा आपल्याला दगा देईल. आपल्यात राजहंस ( अनंत तरे ) असते तर कावळे फडफडले नसते असेही ठाकरे म्हणाले.

Continues below advertisement

सलग तीन वेळा महापौर होणे हा अनंत तरे यांचा विक्रम 

शिवसेना प्रमुखांनी उद्यान नाट्यगृह स्टेडियम दिले. सलग तीन वेळा महापौर होणे हा विक्रम आहे. जिथे गद्दार झाली हेच ते ठाणे त्याच ठाण्यात शिवसेनेच्या निष्ठेपायी तीन वेळा महापौर होणारे अनंत तरे होणे नाही. पुस्तक चांगले आहे. आम्ही एका आईची लेकरे आहोत. अंतुले यांचा पराभव करुन तरे त्याच वेळी दिल्लीला गेले असते. एक काळ असा होता शिवसेना आणि संकट. प्रत्येक संकटात शिवसैनिक छातीचा कोट करून उभा राहतो. एवढी संकटे आले तरी तरे कुटुंब शिवसेनेचा भगवा सोडायला तयार नाही. आई एकवीरा आपल्या पाठीशी आहे बघू कोण येतय आडवं. एकवीरा देवी परीक्षा बघत असेल . दिवाळी येत आहे महिषासुर मारल्या शिवाय आई राहत नाही असेठाकरे म्हणाले. 

 शेतकऱ्याचा एक रुपया गद्दाराच्या हजार कोटीच्या बरोबर

शेतकऱ्याचा एक रुपया गद्दाराच्या हजार कोटीच्या बरोबर होता. वापर झाल्यावर गद्दाराला कचरा कुंडीत फेकून देईल आणि नंतर कपाळावर हात मारत ठाण्यात फिरताना दिसेल. घात केल्यावर यांना कळेल. अशा परिस्थितीत अनंत तरे यांच्या सारखी माणसे पाहिजे होती. विकास झाला आहे तर खर्च कोणाच्या खिशात गेला. महापालिका लुटली आहे , हेलिकॉप्टर घेतली आहे शेतात जायला. शेतात जातो पण भाजी कापतो का रेडा कापतो हे माहित नाही असा टोला देखील ठाकरेंनी शिंदेंना लगावला.  सोमवारी आपला मोर्चा आहे आपल्या सोबत विशेष म्हणजे मनसे आहे. सर्व दुश्मनांना फेकले जाईल तेव्हा मी एकवीरा आईच्या दर्शनाल येईन असे ठाकरे म्हणाले.