Mira Road Advertisement : मुंबईत मराठी भाषिकांना घर नाकरण्यात येत असल्याचा मुद्दा राज्यभर गाजत असतानाच मीरा रोडमधील एका बिल्डरने (Mira Road Construction Advertisement) दिलेल्या जाहिरातीवरून संताप व्यक्त केला जात आहे. या ठिकाणच्या एका बिल्डरने देखील केवळ मारवाडी आणि गुजराती नागरिकांना प्राधान्य देत असल्याची जाहिरात सोशल मीडियावर प्रसिद्ध केली होती.  मिलिअन्स एकर या बांधकाम साईटवर ही जाहिरात प्रसिद्ध झाली होती. मनसेच्या इंग्यानंतर या बिल्डरने राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या नावे माफीनामा लिहिला आणि जाहिरात मागे घेणार असल्याचं सांगितलं. 


मीरा रोड येथे नव्याने उभारल्या जाणाऱ्या इमारतीत मारवाडी आणि गुजराती नागरिकांना प्राधान्य देणार असल्याची जाहिरात मिलिअन्स एकर या बांधकाम साईटवर देण्यात आली होती.  


महाराष्ट्रात मराठी नागरिकांना घर देण्यास नकार देणाऱ्या विकासाबद्दल मीरा भाईंदर मनसेने आक्रमक भूमिका घेतली. त्यामुळे या संदर्भात नमती भूमिका घेत बांधकाम व्यावसायिकांने ही जाहिरात मागे घेत मनसे पक्ष प्रमुख राज ठाकरे यांच्या नावे लेखी माफीनामाच लिहुन दिला आणि त्यांची माफी मागितली आहे. 


आमदार गीता जैन यांचा संबंध? 


या प्रकल्पाशी आमदार गीता जैन यांचे नाव जोडण्यात आले होते. कारण सोनम बिल्डर अँण्ड डेव्हलपर्स हे गीता जैन यांच्या पतीचे आहे. मात्र गीता जैन यांनी या प्रकल्पाशी आपला काहीएक संबध नसल्याच सांगत, मिलिअन्स एकर यांना लेखी नोटीस दिल्याच सांगितलं आहे.


मूग गिळून गप्प का? मनसेचा सवाल


ही जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर मनसेने आक्रमक भूमिका घेतली आणि त्यानंतर तो बांधकाम व्यावसायिक नमला. त्यावर मनसेने एक ट्विट करत यावर गप्प बसणाऱ्यांना प्रश्न विचारला आहे. त्यामध्ये म्हटलं आहे की, 'भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत' म्हणायचं आणि स्वतःच्या समाजाच्या वेगळ्या सोसायट्या करून राहायचं, महाराष्ट्राच्या शहरांतून स्थानिक मराठी माणसालाच हाकलायचं... 'एक भारत, श्रेष्ठ भारत' म्हणणारे आता का मूग गिळून गप्प आहेत?'


परप्रांतीयांचा सरकारला एवढा पुळका का? 


परप्रांतीयांचा सरकारला एवढा पुळका का असा सवाल मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी विचारला आहे. ते म्हणाले की, "गेल्या दोन-तीन दिवसात मराठी द्वेषाच्या ज्या घटना घडल्या त्यावर सरकारची भूमिका स्पष्ट नाही. सरका मधील राजकीय पक्ष याकडे डोळेझाक का करत आहे? यांना परप्रांतीयांचा इतका पुळका का? चुकीला चूक म्हणता येत नसेल तर तुमचा सरकार म्हणून उपयोग काय?"


ही बातमी वाचा: