ठाणे : प्रधानमंत्री आवास योजना (नागरी), AHP-PPP या घटकाअंतर्गत म्हाडा आणि चट्टा डेव्हलपर्स अँड प्रमोटर्स यांच्यातर्फे अंबरनाथ तालुक्यातील वांगणी येथील चड्डा रेसिडेन्सी या गृहनिर्माण प्रकल्पातील 2000 1BHK सदनिकांच्या विक्रीसाठी 9 डिसेंबर 2023 रोजी आयोजित संगणकीय प्रक्रियेसाठी अर्ज नोंदणी आणि अर्ज सादर करण्याच्या प्रक्रियेला प्रारंभ झाला आहे. इच्छुक अर्जदारांनी https://housing.mhada.gov.in या संकेतस्थळांवर जाऊन अर्ज नोंदणी व अर्ज भरणा करावा, असे आवाहन चट्टा डेव्हलपर्स अँड प्रमोटर्स यांच्यातर्फे करण्यात आले आहे


देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सर्वांसाठी घरे' या संकल्प पूर्तीसाठी च्या उद्देशाने चड्ढा डेव्हलपर्स अँड प्रमोटर्स यांच्यातर्फे ठाणे जिल्ह्यातील वांगणी येथे 155 एकर जागेवर सात मजल्यांच्या 133 इमारतींचा भव्य प्रकल्प उभारण्यात येत आहे या प्रकल्पाच्या माध्यमातून सुमारे 25,000 सदनिकांची उभारणी करण्याचे नियोजन केले जात आहे. पहिल्या टप्यांतर्गत 8,200 सदनिकांचे बांधकाम सुरू असून यामध्ये वन बीएचके स्वरुपाच्या 348 चौरस फूट आकारमानाच्या अद्ययावत व सुसज्ज सदनिका 2 बाल्कनीसह बांधण्यात आल्या असून एका सदनिकेची किंमत 16,80,000 रुपये आहे. यात मुद्रांक शुल्क व नोंदणी शुल्काचा समावेश असणार नाही


सदर संगणकीय प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी ऑनलाइन सादर करावयाच्या अर्जासमवेत अर्जदाराने प्रत्येकी 5590 रुपये अनामत रक्कम भरणे गरजेचे आहे. ऑनलाइन अर्ज नोंदणीसाठी 20 जानेवारी, 2024 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत, ऑनलाइन पेमेंट स्वीकृतीसाठी 21 जानेवारी, 2024  रोजी रात्री 11.59 वाजेपर्यंत, ऑनलाइन बँकेत आरटीजीएस/ एनईएफटी द्वारे अनामत रकमेचा भरणा करण्यासाठी 22 जानेवारी, 2024 रोजी रात्री 11.59 वाजेपर्यंत मुदत देण्यात आली आहे. 26 जानेवारी 2024 रोजी सकाळी 10.00 वाजता सदनिका विक्रीची सोडत करण्यात येईल अर्ज सादर करण्याची प्रक्रिया ऑनलाईन असल्यामुळे कागदपत्र सादर करण्यासाठी मुदतवाढ मिळणार नाही. त्यामुळे पात्रतेसाठी पॅन कार्ड, आधार कार्ड, बँक पासबुक यांच्या छायांकित प्रती, आणि फोटो सादर करणे गरजेचे आहे.


ही बातमी वाचा: