जालना: जालना येथील अंतरवाली सराटी (Jalna Protest)  येथे मराठा आरक्षणासह अन्य मागण्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला शुक्रवारी संध्याकाळी हिंसक वळण लागल्यानंतर पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांचे नाव चर्चेत आहे. सोमवारी पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची पुण्यात राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीआयडी) अधीक्षकपदी सोमवारी बदली करण्यात आली. त्यावर आता  मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी (Manoj Jarange)  निशाणा साधला आहे. आंदोलकांना मारल्याचे त्यांना बक्षीस मिळाले आहे .निष्पाप जनतेवर कट रचून ज्यांनी हल्ला केला त्यांना बढती मिळणार असेल तर याची माहिती घेईन. त्यांच्यावर न्यायालयीन चौकशी बसणार आहे. मात्र यातून कोणालाही सुट्टी मिळणार नाही अशी प्रतिक्रिया दोशी यांच्या बदलीनंतर मनोज जरांगे पाटलांनी दिली आहे. ते कल्याण मधील जाहीर सभेनंतर पत्रकारांशी बोलत होते.

Continues below advertisement

 जालनातील मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज करण्याचा आदेश गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला नसल्याचे माहिती अधिकारात समोर आले आहे. त्यामुळे लाठीचार्ज करणारी  व्यक्ती कोण त्याचा शोध मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी घ्यावा अशी मागणी करणार असल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले  आहे.ते कल्याण मध्ये सकल मराठा समाजाच्या सभेत बोलत होते.

 राज ठाकरे यांच्या टीकेला मनोज जरांगे पाटलांचे प्रत्युत्तर

 मनोज जरांगे पाटील यांच्या मागे कोणीतरी आहे असं राज ठाकरे यांनी ठाण्यात म्हटलं होतं.त्याला आता मनोज जरांगे पाटलांनी प्रत्युत्तर दिलंय. माझ्या पाठीमागे कोणीतरी आहे हे राज ठाकरेंचं म्हणणं बरोबर आहे. माझ्यामागे सामान्य मराठ्यांची शक्ती आहे. स्क्रिप्ट वगैरे मी वाचत नसतो वाचून माणूस एवढा बोलू शकत नाही अशी प्रतिक्रिया जरांगे पाटलांनी यावर दिली आहे. 

Continues below advertisement

संताजी धनाजीसारखा भुजबळ यांना सगळीकडे मी दिसतो

 भुजबळांना संताजी धनाजीसारखा आता सगळ्या ठिकाणी मीच दिसतोय. त्यांना वैयक्तिक विरोध नव्हता, वैचारिक विरोध होता. मात्र सुरुवात त्यांनी केली. मराठा आरक्षणाला विरोध करण्याची गरज नव्हती. त्यामुळे आता त्यांच्यावर टीका करणार असं जरांगे पाटलांनी म्हटलं आहे. 

लाठीचार्जचे आदेश कोणी दिले?

जालन्यातील अंतरवाली सराटी लाठीचार्ज (Antarwali Sarathi Lathicharge) प्रकरणात मोठी माहिती समोर आली आहे. मराठा आंदोलकांवर (Maratha Reservation Protest) झालेल्या लाठीचार्जचे आदेश राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले नसल्याचं माहिती अधिकारातून समोर आलं आहे. जालन्याचे पोलीस उपाधीक्षक आर सी शेख यांनी ही माहिती दिली आहे.  माहिती अधिकार कार्यकर्ते आसाराम डोंगरे यांनी जालन्यातील लाठीचार्जचे आदेश कुणी दिले होते याची माहिती मागवली होती. त्यावर जालन्याचे पोलीस उपअधिक्षक आर सी शेख यांनी माहिती दिली. आंदोलनकर्त्यांवर लाठीचार्ज करण्यासाठी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून आदेश नाहीत असं त्यात म्हटलं आहे.