Thane News :  फेसबुक पोस्ट केल्याच्या कारणावरुन ठाण्यात (Thane) ठाकरे गटाच्या महिला पदाधिकाऱ्याला मारहाण झाल्याची घटना घडली. घोडबंदर रोडवरील कासारवडवली परिसरात हा प्रकार घडला. रोशनी शिंदे (Roshni Shinde) असं या महिला पदाधिकाऱ्याचं नाव आहे. त्या सहा महिन्यांच्या गर्भवती असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी अजून एफआयआर (FIR) दाखल केलेली नाही. वैद्यकीय अहवाल आल्यावर तपास सुरु करणार असल्याची माहिती पोलिसांनी (Police) सांगितली आहे. या घटनेनंतर ठाकरे गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.


ठाकरे गटाच्या महिला पदाधिकारी रोशनी शिंदे या संध्याकाळी ऑफिसमधून घरी परतण्याच्या तयारीत होत्या. त्यावेळी ऑफिसच्या आवारात शिरुन त्यांना शिवसेनेच्या शिंदे गटाच्या महिला पदाधिकाऱ्यांनी मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. पोलिसांनी मात्र अजून एफआयआर दाखल केलेली नाही. ही घटना सोमवारी रात्री ठाणे शहरात घडली आहे. फेसबुक पोस्ट टाकल्यानं ठाकरे गटाच्या पदाधिकारी रोशनी शिंदे यांना मारहाण झाली आहे.


आरोपींना त्वरित अटक करा नाहीतर खुर्च्या खाली करा, पोलिस ठाण्याबाहेर घोषणाबाजी


धक्कादायक म्हणजे ही महिला सहा महिन्यांची गर्भवती असल्याची माहिती ठाकरे गटाच्या महिला युवतींनी दिली आहे. मात्र पोलिसांनी अद्यापपर्यंत FIR दाखल केली नाही. सध्या मारहाण झालेल्या महिलेला जवळच्या रुग्णालयांमध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आले असून उपचार सुरु आहेत.  आरोपींना त्वरित अटक करा नाहीतर  खुर्च्या खाली करा. भगिनींना न्याय मिळालाच पाहिजे अशा प्रकारची घोषणाबाजी कासारवडवली पोलीस स्टेशन बाहेर सुरु आहे. दरम्यान, ठाकरे गटाचे कार्यकर्ते कासारवडवली पोलीस स्थानकात दाखल झाले  आहेत. पोलिसांनी एक तासात आरोपींना अटक केली नाहीतर ठाकरे गटाच्या महिला पोलिसांना  बांगड्या देणार असल्याचा इशारा ठाकरे गटाचे प्रवक्त्यांनी पोलिसांना दिला आहे. वैद्यकीय अहवालानंतर पोलिस पुढचा तपास सुरु करणार आहेत.


सरकारकडून जनतेला त्रास देण्याचं काम सुरु


आमच्या कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल केले जात असल्याचे वक्तव्य ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे यांनी केलं. युवती सेनेच्या पदाधिकारीवरती भ्याड हल्ला केला आहे. ती महिला प्रेग्नंट असतानाही तिला मारहाण केली आहे. जनेताला त्रास देण्याचे काम सरकार करत असल्याचा आरोप विचारे यांनी केला. मारहाण झालेल्या घटनेचा आम्ही निषेध करतो. उद्या जर त्या महिलेला काय झालं तर त्याची सर्वस्वी जबाबदारी ही मुख्यमंत्री आणि पोलिस कमीशनरची असेल असे विचारे म्हणाले. राज्यात गेल्या नऊ महिन्यापासून अत्याचार सुरु असल्याचे विचारे म्हणाले. 


महत्त्वाच्या बातम्या:


ठाकरे गट Vs शिंदे गट! शिरसाटांच्या प्रतिमेला जोडे मारो केल्याने शिवसेना महिला आघाडी पोलिसात जाणार