Dombivli Crime News : गुंडांच्या टोळीनं हातात कोयता घेऊन वृध्द दाम्पत्याच्या (Elder couple) घरी धुडगूस घातल्याची घटना डोंबिवलीमधील (Dombivli) देसले पाडा परिसरात घडली. तुमचा मुलगा कुठे आहे असे विचारत या टोळीने घराच्या दरवाजावर कोयत्यानं प्रहार केला. इतकेच नव्हे तर घरात घुसून दमदाटीही केली. पोलीस (Police) ठाण्यात तक्रार केली तर मारण्याची धमकी दिली आहे. या घटनेनंतर परिसरात दहशतीचं वातावरण पसरलं आहे.


वृध्द दाम्पत्याच्या धमकी दिल्याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात (Manpada Police Station) जितू निशाद आणि त्याच्या  साथीदाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांचा शोध सुरु करण्यात आला आहे. जितू निषाद हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्या विरोधात याआधी देखील गंभीर गुन्हे दाखल झाले आहेत.


जबरदस्तीनं घरात घुसून दमदाटी


बेबी देसले आणि त्यांचे आजारी पती हे आपल्या मुलासह देसले पाडा परिसरात राहतात. शनिवारी बेबी आणि तिचे आजारी पती घरात एकटे होते. याच दरम्यान जितू निषाद आणि त्याचे चार साथीदार त्याच्या घराजवळ येवून शिवीगाळ करु लागले. तुमचा मुलगा कुठे आहे असे बोलत त्यांनी हातातील कोयत्याने घराच्या दरवाजावर जोरदार प्रहार केले. यामुळं घाबरलेल्या बेबी देसले यांनी त्यांना मुलगा घरात नसल्याचे सांगितले. मात्र, या टोळीनं जबरदस्तीनं दरवाजा उघडून घरात घुसून जोर जोरात ओरडून धिंगाणा घातला. याच दरम्यान गोंधळ एकून आजूबाजूचे नागरिक जमा झाले. यावेळी जितू आणि त्याच्या साथीदारांनी त्यांना देखील धमकी दिली.


आरोपींचा शोध सुरु


याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात (Manpada Police Station) तक्रार करेल तर पुन्हा मारु अशी धमकी जीतू आणि त्याच्या साथीदारांनी या वृद्ध दाम्पत्याला दिली. जवळपास अर्धा ते पाऊण तासात धिंगाणा सुरु होता. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात जितू आणि त्याच्यासाठी साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. मानपाडा पोलीस जितू  आणि त्याच्या साथीदारांचा शोध घेत आहेत. दरम्यान, जितू निषाद विरोधात याआधी देखील गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल झाले आहेत. या परिसरात त्यांची दहशत आहे. लवकरच जितू आणि त्याच्या साथीदारांना अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल असं मानपाडा पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे.


महत्त्वाच्या बातम्या:


Pune Yerwada jail News : पुण्यातील येरवडा कारागृहात कैदी एकमेकांशी भिडले; प्लास्टिक बकेट, भाजी वाढण्याच्या वरगळ्यानं दोन गटांत तुफान हाणामारी