Thane Dombivali Bandh:  शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushama Andhare) यांचा निषेध नोंदवण्यासाठी शिंदे गट (Shivsena Eknath Shinde Faction),  भाजप (BJP) व हिंदुत्ववादी संघटनांकडून आज डोंबिवली (Dombivli) व कल्याण (Kalyan) ग्रामीण बंद ची  हाक देण्यात आली होती. व्यापारी संघटना, रिक्षा संघटना, हिंदुत्ववादी संघटना, वारकरी संप्रदाय आदींनी या बंदमध्ये सहभाग घेतला असल्याचा दावा काल करण्यात आला होता. लोकांनी देखील या बंदमध्ये सहभागी होण्याचा आवाहन करण्यात आलं होतं. आज डोंबिवली स्टेशन परिसर व कल्याण ग्रामीण भागात रिक्षा, केडीएमटीच्या बसेस सुरळीत होत्या. काही दुकानदारांनी दुकाने बंद ठेवून बंदमध्ये सहभाग घेतला असला तरी काही दुकानदारांनी मात्र आपले दुकाने आज उघडली होती. त्यामुळे या बंदला संमिश्र प्रतिसाद बघायला मिळाला.


शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी साधुसंतांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. सुषमा अंधारे यांनी केलेल्या वक्तव्याचा शिंदे गट, भाजपा तसेच हिंदुत्ववादी संघटनांनी निषेध केला आहे. वारकऱ्यांकडून देखील या वक्तव्याचा निषेध नोंदवण्यात येतोय. शिंदे गट, भाजप व हिंदुत्ववादी संघटनांकडून सुषमा अंधारे यांचा निषेध नोंदवण्यासाठी डोंबिवली व कल्याण ग्रामीण बंदची हाक देण्यात आली होती. या बंदमध्ये व्यापारी संघटना, रिक्षा संघटना, वारकरी, हिंदुत्ववादी संघटना देखील सहभागी असल्याचा दावा करण्यात आला होता. हिंदुत्व साठी या बंदमध्ये सहभागी होण्याचा आवाहन देखील करण्यात आलं होतं .खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचा मतदारसंघ असल्याने या ठिकाणी बंद यशस्वी होईल अशी शक्यता वर्तवण्यात येत होती . मात्र प्रत्यक्षात आज या बंदला संमिश्र प्रतिसाद पाहायला मिळाला. प्रत्यक्षात शिंदे गट व भाजप प्रणित रिक्षा संघटना वगळता इतर कोणत्याही रिक्षा संघटनेने या बंदमध्ये सहभाग घेतला नाही.. के डी एम टी च्या बसेस देखील सुरळीत होत्या , नागरिक देखील खाजगी वाहन घेत रस्त्यावर दिसत होती..त्यामुळे वाहतूक व्यवस्थेवर काही परिणाम झाला नाही.तसेच  स्टेशन परिसरात काही ठिकाणी दुकान बंद होते तर काही ठिकाणी दुकाने उघडी होती. दुपारनंतर उर्वरित दुकाने देखील उघडणार असल्याचा कालच व्यापारी संघटनेने सांगितलं होतं.त्यामुळे या बंदला एकूणच संमिश्र प्रतिसाद मिळाल्याचा पाहायला मिळाला.


डोंबिवलीत बजरंग दल आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते आमने सामने


ठाकरे गटातील उपनेत्या सुषमा अंधारे यांनी संतांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. सुषमा अंधारे यांच्या निषेधार्थ बाळासाहेबांची शिवसेना ,भाजपा, हिंदुत्ववादी संघटनेने डोंबिवली व कल्याण ग्रामीण बंद पुकारला आहे . आज दहा वाजता हिंदुत्ववादी संघटना डोंबिवली इंदिरा चौकात घोषणाबाजी करत असताना मुंबईत महाविकास आघाडी तर्फ आयोजित मोर्चासाठी ठाकरे गटाचे कार्यकर्ते घोषणाबाजी करत जात होते. यावेळी दोन्ही गटाकडून घोषणाबाजी करण्यात आली..घटना स्थळी पोलीस उपस्थित असल्याने कोणताही गैरप्रकार झाला नाही