Sushma Andhare : महाराष्ट्रातील सगळ्यात जास्त क्राईम रेट (crime rate) हा कल्याणचा (Kalyan) आहे. इथे दहशतीचे वातावरण आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये सत्ताधारी आमदारांनी एकच काम केले, ते म्हणजे आपल्या मर्जीतील पोलिस निरिक्षक आणून बसल्याची टीका शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी केली आहे. जो कोणी सत्ताधारी आमदारांवर बोट ठेवतो. लगेच त्याच्या विरोधात खोटे गुन्हे दाखल करायचे. त्यामुळं इथला क्राईम रेट वाढत गेल्याचे अंधारे म्हणाल्या. पोलीस ठाण्यात गोळीबार होतो तर पोलिसांचा धाक काय? अशी टीका देखील सुषमा अंधारे यांनी केली आहे. अंधारे या कल्याण पश्चिमेत ठाकर गटाचे उमेदवार सचिन बासरे यांच्य प्रचारासाठी आल्या होत्या. यावेळी त्या बोलत होत्या.


सोयाबीनचा भाव 3800 ते 3500 पर्यंत खाली घरसला


दरम्यान, सोयाबीन आणि कापसाच्या मुद्यावरुन देखील सुषमा अंधारे यांनी फडणवीस यांच्यावर टीका केली. देवेंद्र फडणवीस यांनी पाशा पटेल यांच्यासोबत कृषी दिंडी काढली होती. कृषी दिंडी काढत त्यांनी सांगितले होते की, सोयाबीनला 6 हजार भाव देऊ. आत्ता फडणवीसांचे सरकार होते. तेव्हा सोयाबीनचा भाव 3800 ते 3500 पर्यंत खाली घरसला आहे. सरकार असताना तुमचे पंचाग हरवले आहे का? असा सवाल अंधारे यांनी उपस्थित केला. का बरं सोयाबीन आणि कापसाला भाव दिला नाही. उद्धव ठाकरे यांचे सरकार असतांना शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झाल्याचे अंधारे म्हणाल्या. सोयाबीनला 6 हजार आणि कापसाला 12 हजार रुपयांपर्यंतचा दर गेला होता असेही सुषमा अंधारे म्हणाल्या.


फडणवीस आत्ता घोषणांचा पाऊस पाडत आहेत


फडणवीस आत्ता घोषणांचा पाऊस पाडत आहेत. त्यांना साधा प्रश्न विचारायचा आहे की एक रुपयाच्या विम्याचे चॉकलेट दाखवले होते. ते काय झाले. विमा कंपन्यांचा फायदा फडणवीसांनी केल्याचा आरोप सुषमा अंधारे यांनी केला आहे. विमा कंपन्यांचा फायदा करुन देत असताना शेतकऱ्यांच्या पदरात काय पडले. ज्या मुस्लिमांबद्दल काय भूमिका आहे. हे अवघा महाराष्ट जाणतो. मुस्लीमांशी शत्रूभावाने जे लोक वागतात. अशा लोकांना कल्याण पश्चिमेतून मुस्लीमांची मते हवी आहेत. आत्ता त्यांना साबीर भाईंची आठवण येत आहे. हे मुस्लीम समाज ओळखून आहे असा टोलाही त्यांनी शिंदे गटाला लगावला. 


महत्वाच्या बातम्या:


देवेंद्र फडणवीसांनी जातीत जात ठेवली नाही, राज्यात जातीय द्वेष पसरवला, सरसंघचालकांनी त्यांचे कान उपटावेत: सुषमा अंधारे