Thane: जम्मू काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्यात आपले वडील गमावलेल्या डोंबिवलीच्या ध्रुव हेमंत जोशीने मंगळवारी जाहीर झालेल्या दहावी बोर्डाच्या परीक्षेत 78 टक्के गुण मिळवले आहेत. "बाबा असते तर.." ही एकच भावना डोंबिवलीतील ध्रुव हेमंत जोशीच्या मनात सतत खोलवर घर करून बसली आहे. 22 एप्रिलला पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यातून जोशी कुटुंब अजूनही सावरलेले नाही. (Pahalgam Terror Attack)

Continues below advertisement

10 वीच्या परीक्षेत घवघवीत यश

ध्रुव डोंबिवलीतील ओंकार इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिक्षण घेतो. परीक्षा संपल्यानंतर वडिलांनी त्याला आणि कुटुंबीयांना निसर्गरम्य सहलीसाठी काश्मीरला घेऊन जाण्याचं ठरवलं होतं. सहलीला पहलगाम येथे कुटुंबासोबत आनंद साजरा करत असताना 22 एप्रीलला संपूर्ण कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला.  पहलगाम येथे अचानक दहशतवादी हल्ल्यात ध्रुवचे वडील हेमंत जोशी, तसेच संजय लेले आणि अतुल मोने या डोंबिवलीतील आणखी दोन नागरिकांनी प्राण गमावले. या घटनेनंतर संपूर्ण डोंबिवली शहर हळहळून गेलं. ध्रुवसोबत ऋचा मोने हिचीही बारावीची परीक्षा नुकतीच संपली होती. अभ्यासाचा तणाव उतरवण्यासाठी दोघांच्या कुटुंबांनी मिळून ही सहल ठरवली होती. मात्र काही क्षणातच सगळं आयुष्यच पालटून गेलं.

मंगळवारी जेव्हा ध्रुवचा निकाल लागला. 78 टक्के मिळवून दहावीचा महत्तवाचा टप्पा त्यानं पार केला. पण त्याच्या यशाचा आनंद साजरा करण्यासाठी त्याचे वडील त्याच्या पाठीशी नसल्यानं ध्रुव व्याकूळ झाला होता. आपलं यश पहायला बाबा नाहीत ही भावना दाटून आली होती. त्यामुळेच कोणताही सत्कार, सेलिब्रेशन किंवा उत्सव त्याने नाकारला आहे.

Continues below advertisement

दहावीचा निकाल जाहीर

राज्याचा दहावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. यंदा दहावीचा निकाल 95.81 टक्के इतका लागला आहे. यंदाच्या निकालातही कोकण विभागाने 99.01 टक्क्यांसह अव्वल ठरला आहे. तर 97.21 टक्क्यांसह मुलींनी यंदाही बाजी मारली आहे. 1 मार्च ते 26 मार्च 2024 यादरम्यान दहावीची परीक्षा झाली होती. यंदा 15 लाख 60 हजार 164 विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती. त्यापैकी 14 लाख 84 लाख 441 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

हेही वाचा:

SSC Result 2024 : दहावीचा निकाल वेबसाईटवर जाहीर; झटपट निकाल पाहण्यासाठी 'या' वेबसाईट्स फॉलो करा!