Kalyan Latets News : रस्त्यावरील खड्ड्यामुळे एकही जीव जाता कामा नये खड्डे तत्काळ बुजवा अशी सक्त सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी आजच दिल्या. त्यानंतर कल्याण डोंबिवलीमधील रस्त्यावरील खड्डे जैसे तसेच आहेत. बदलापूर खोनी रोडवर म्हाडा प्रकल्पासमोर शनिवारी सकाळच्या सुमारास खड्डे वाचवताना खड्ड्यात दुचाकी आदळल्याने पडलेला दुचाकी स्वार बसच्या मागच्या चाकाखाली चिरडला गेल्याने जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. बदलापूर पाईप लाईन रोड हा एम आय डी सी च्या अखत्यारीत येतो, या पावसात खड्ड्यांमुळे या रस्त्याची दुरवस्था झाली आहे.
एम आय डी सी कडून रस्ते दुरूस्तीचे काम सुरू असले तरी दगड माती डांबराचे ठोकळे टाकून बुजवले जाणारे खड्डे काही तासातच उघडे पडत आहेत. घटना घडल्यानंतर स्थानिक ग्रामस्थांनी काँक्रिट टाकून परिसरातील खड्डे बुजवले मात्र एम आय डी सी खड्ड्या बाबत कायम स्वरुपी उपायोजना कधी करणार? असा सवाल आता उपस्थित केला जातोय.
रस्त्यावरील खड्डे आता त्रासदायक ठरण्याबरोबर जीवघेणे ठरत आहेत. आज सकाळी अंकित थैवा हा तरुण अंबरनाथ वरून घणसोली एमआयडीसीमध्ये नेहमीप्रमाणे आपल्या दुचाकीवरून डकामावर जात होता. खोनीजवळील म्हाडा प्रकल्पासमोर पडलेल्या खड्ड्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने त्याची दुचाकी आदळली. यामुळे अंकित गाडीवरून रस्त्यावर फेकला गेला. याचवेळी दुर्दैवाने अंकित दुचाकीवरून उडून बसच्या मागच्या उजव्या बाजूने येणाऱ्या केडीएमटीच्या बसवर आदळून चाकाखाली फेकला गेला. या गंभीर अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान याप्रकरणी मानपाडा पोलीसानी अंकितच्या वडिलांच्या तक्रारी वरून केडीएमटी बसचालका विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
या घटनेनंतर शहरातील आणि एमएमआरडीए, रस्ते विकास महामंडळ यांच्या अखत्यारीतील रस्त्यावरील खड्ड्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. तर खड्ड्याससाठी जबाबदार असलेल्या प्रशासनाला मोकळे सोडत, चालकांवर दोष ठेवल्याने आश्चर्य आणि संताप व्यक्त होत आहे.
महत्वाच्या बातम्या
Eknath Shinde : रस्त्यावरील खड्डे बुजवण्याची यंत्रणा 24 तास सुरु ठेवा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आदेश