Kalyan Latest News Update: रियाल करन्सीच्या नावाने पैसे दुप्पट करण्याचे आमीष दाखवून अनेकांना लाखोंचा गंडा घालणाऱ्या बंगालच्या टोळीला कल्याणमधील कोळशेवाडी पोलिसांनी अटक केली. इसाक शेख ,सोफीकुल शेख ,इमरान खान आणि हमिदाबीबी गाजी असे या चार आरोपींची नावे आहेत ..हे चौघे प्रवासादरम्यान ओळख काढत विश्वास संपादन करायचा आणि त्यानंतर रियाल करन्सीचे आमिष दाखवत लाखोंचा गंडा घालत होते. ठाण्यात राहणाऱ्या अजीम नावाच्या इसमाच्या मुलीचे लग्न असल्याने त्याला पैशांची गरज होती, तोही या चार जणांच्या आमिषाला बळी पडला.
ठाणे येथील राबोडी परिसरात राहणारे अजीम करवेकर हे कळवा येथे रिक्षा चालवतात .काही दिवसांपूर्वी त्यांच्या रिक्षात एक महिला बसली व ओळख वाढवली. त्या महिलेने काही दिवसात अजीम यांचा विश्वास विश्वास संपादन केला.. चर्चेदरम्यान तिने सांगितले की मी अशा काही लोकांना ओळखते चे पैसे दुप्पट करून देतात. अजीम यांच्या मुलीचे लग्न होते त्यांना पैशांची गरज होती त्यामुळे ते आमिषाला बळी पडले. या महिलेने आपल्यातील साथीदारांना अजीम यांची भेट घालून दिली. या भेटी दरम्यान या चौघांनी अजीम यांना रियाल करन्सी दिली. ते करन्सी त्याने बाजारात चालवली त्यांना पैसे मिळाले ..त्यानंतर यांना विश्वास पटल्यानंतर त्यांनी एक लाख 80 हजार रुपये या चौघांना देण्याचे ठरवले.. त्यानुसार या या चौघांनी त्यांना अजून यांना रियाल करन्सी घेण्यासाठी कोळशेवाडी परिसरात बोलावले. अजीम यांच्याकडून एक लाख 80 हजार रुपये घेत त्यांच्या हातात हातात रियान करन्सी सांगत रुमाला बांधलेला एक बंडल दिले..
काही वेळाने अजीम यांनी रुमाल उघडून पाहिला असता त्यांना या रुमाला कागदाचे बंडल असल्याचा दिसून आलं त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी या प्रकरणात कोळशेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय हरिदास बोचरे आणि पोलीस अधिकारी दिनकर पगारे यांच्या पथकाने या प्रकरणाचा तपास सुरू केला. आरोपींचे मोबाईल ट्रेस करत त्यांनी एका व्यक्तीचा नंबर मिळवला. त्या व्यक्तीला सुद्धा या चौघांनी असेच आमिष दाखवल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी त्या व्यक्तीच्या मदतीने कोळशेवाडी परिसरात सापळा रचत या चौघांनाही बेड्या ठोकल्यात. याप्रकरणी या चार जणांनी आणखी काही जणांना फसवले असल्याचे दाट शक्यता पोलिसांनी वर्तवली असून त्या दृष्टीने पोलिसांनी अधिक तपास सुरू केला आहे.