ठाणे : कल्याण पूर्वमधील चिकणी पाडा परिसरात चार मजली इमारत कोसळल्याने (Kalyan Building Collapsed) सहा जणांचा मृत्यू झाला. त्यामध्ये तीन महिला, दोन पुरुष आणि एका दीड वर्षाच्या चिमुरडीचा समावेश आहे. तिसऱ्या मजल्यावरील स्लॅब कोसळल्याने ही घटना घडली. या ठिकाणी महापालिकेचे बचावपथक पोहोचलं असून ढिगाऱ्याखाली आणखी कोणी सापडले आहे का याचा शोध सुरू आहे.

Continues below advertisement

कल्याण पूर्व मंगलराघो नगर परिसरातील सप्तशृंगी या इमारतीमध्ये ही धक्कादायक घटना घडली. या चार मजली इमारतीतील तिसऱ्या मजल्यावर डागडुजीचे काम सुरू होते. त्यावेळी त्याचा स्लॅब कोसळला. तो थेट तळमजल्यापर्यंत कोसळला. त्यामुळे या ढिगाऱ्याखाली अनेकजण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात आली. 

Kalyan Building Collapsed : सहा जणांचा मृत्यू

इमारतीचा स्लॅब कोसळल्यानंतर त्या ठिकाणी अग्निशनम दल, महापालिकेचे पथक पोहोचले. सुरुवातीला आठ जणांना या ढिगाऱ्याकडून बाहेर काढण्यात आलं. त्यामध्ये सहा जणांचा मृत्यू झाला. त्यामध्ये तीन महिला, दोन पुरुष आणि एक दीड वर्षांच्या चिमुकलीचा समावेश आहे. इतर दोन जण जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

Continues below advertisement

Kalyan Building Collapsed : अजूनही काहीजण अडकल्याची भीती

तिसऱ्या मजल्यावर काम सुरू असताना या इमारतीमध्ये अनेकजण होते अशी माहिती समोर आली आहे. या इमारतीच्या दुसऱ्या आणि पहिल्या मजल्यावर घरांमध्ये नातेवाईकही आल्याची माहिती आहे.  

मृतांची नावे

  • प्रमिला साहू (58)
  • नामस्वी शेलार (1.5)
  • सुनीता साहू (37)
  • सुजाता पाडी (32)
  • सुशीला गुजर (78)
  • व्यंकट चव्हाण (42)

जखमीची नावे

  • अरुणा रोहिदास गिरणारायन (48)
  • शरवील श्रीकांत शेलार (04)
  • विनायक मनोज पाधी (4.5)   
  • यश क्षीरसागर (13) 
  • निखिल खरात (27)
  • श्रद्धा साहू (14)