ठाणे: महानगर टेलिफोन निगम लिमिटेड मुंबई कर्मचारी कल्याणकारी संस्था ही डोंबिवलीमधील ठाकुर्लीमध्ये कार्यरत आहे. 1993 साली या संस्थेची स्थापना झाली असून त्याला आता 30 वर्षे पूर्ण झाली आहेत. कुलाबा पासून कर्जत- कसारापर्यंत या संस्थेकडून सेवा दिली जाते. वसंत चव्हाण हे गेली 24 वर्षे या संस्थेचे अध्यक्ष असून संस्थेचे सर्व कामकाज हे त्यांच्या आणि सेक्रेटरी दिलीप रायर यांच्या मार्गदर्शनाखाली चालते.


MTNL कंपनीमध्ये कार्यरत असलेले किंवा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना आणि त्याच्या कुटुंबीयांना कोणतेही मार्गदर्शन हवे असल्यास ते या संस्थेकडून दिलं जातं. तसेच देशात आणि परदेशात राहणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांनाही मदत केली जाते. 


या कामांसाठी कर्मचाऱ्यांना मदत केली जाते


वर्षातून एकदा प्रत्येक कर्मचाऱ्याला त्याच्या जन्म तारखेप्रमाणे लाईन सर्टिफिकेट द्यावे लागते. त्यासाठी या संस्थेकडून मदत केली जाते. तसेच मेडिकलचे इन्सुरन्सचे पैसे मिळवून देणे, तसेच मेडिकल संबंधी इतर काही सुविधा मिळण्यासाठी या संस्थेकडून कर्मचाऱ्यांना मदत केली जाते. ही संस्था मुख्यतः कर्मचाऱ्यांसाठी CGHIS , CGHS अशा मेडिकल फॅसिलिटी मिळवण्यासाठी कार्यरत आहे. यासाठी कोणतीही फी आकारली जात नाही. परंतु जर कुणी स्वेच्छेने देणगी दिली तर त्यासाठी पावती दिली जाते.  


सभासदांना ऑनलाईन फॉर्म भरून देणे, किंवा कोणत्याही नव्या योजनेची माहिती समजावून सांगणे आणि इतर सेवाही या संस्थेकडून देण्यात येतात. जे लोक अपंग असतील किंवा वृद्ध असल्याने त्यांना प्रवास करता येत नाही त्यांच्यासाठी घरपोच सुविधा तीही निशुल्क दिली जाते. आतापर्यंत 80 ते 90 हजार लोकांना या संस्थेकडून मदत केली गेली आहे. तसेच 2500 लोकांना घरी जाऊन मदत करण्यात आली आहे. या व्यतिरिक्त राज्य सरकारच्या आणि केंद्र सरकारच्या जवळपास दोन हजार लोकांनाही या संस्थेकडून मदत केली गेली आहे. 


दर रविवारी या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांकडून विविध कर्मचाऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना माहिती देण्याचं काम केलं जातं. तसेच सेक्रेटरींच्या राहत्या घरी सुटीच्या दिवशी तसेच बँक कामाच्या दिवशी सकाळी 10 ते 1 आणि सायंकाळी 5 ते 7 या दरम्यान सर्व माहिती विनामूल्य दिली जाते. 


ही बातमी वाचा :