Thane Rain: भिवंडी शहर तसेच ग्रामीण भागामध्ये दोन ते तीन दिवसांपासून कोसळधारेसह संततधार पाऊस कोसळत आहे. या मुसळधार पावसाचा सर्वाधिक फटका भिवंडी (Bhiwandi) तालुक्याला बसला आहे. भिवंडी शहरासह ग्रामीणमध्ये पूरस्थिती निर्माण झाल्याने गुरुवारी (29 मे) अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. मुसळधार पावसामुळे सर्वत्र पूरस्थिती निर्माण झाली आहे.


भिवंडी शहरालगतच्या कामवारी नदीसह वारणा नदीची पातळीही पूरसदृश झाली आहे. तर भिवंडी पारोळ रोडवरील कांबे गावच्या हद्दीत मुख्य रस्त्यावर पाणी साचल्याने जुनांदुर्खी, कांबे, टेंभवली, पालीवली, गाणे, फिरिंगपाडा, लाखीवली, चिंबीपाडा, कुहे, आंबरराई, खडकी, भुईशेत, माजिवडे, धामणे, वाण्याचा पाडा आदी गावांचा भिवंडी शहराशी संपर्क तुटला असूनही काही गावकरी आपलं घर गाठण्यासाठी या पाण्यातून जीवघेणा प्रवास करत आहेत. 


मुसळधार पावसामुळे भिवंडी तालुक्यातील वारणा, कामवारी या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्याने तहसीलदार आणि पाटील यांनी नागरीकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. हवामान खात्याच्या इशाऱ्याप्रमाणे पावसाचा जोर कायम राहिल्यास आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेला सतर्क राहण्याच्या सूचना महसूल यंत्रणेने दिल्या आहेत.


चार जुलैपर्यंत दिल्लीत मुसळधार पावसाचा इशारा


देशाची राजधानी दिल्लीतही (Delhi) जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी (29 जून) दिल्लीत वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडू शकतो. दिल्लीत चार जुलैपर्यंत विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस (Heavy Rain) पडण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर कमाल तापमान 36 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 26 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. उत्तर प्रदेशातील 31 जिल्ह्यांमध्येही हवामान खात्याने पावसाचा अंदाज वर्तवला आहे. या जिल्ह्यांमध्ये हवामान खात्याने यलो अलर्ट जारी केला आहे.


हिमाचलसह जम्मू-काश्मीरमध्ये पावसाचा कहर


हिमाचल प्रदेशात (Himachal Pradesh) पावसाने कहर केला आहे. राज्यात सतलज नदीच्या पाणी पातळीत सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे परिस्थिती बिकट होत चालली आहे. यामध्ये काही जणांचा मृत्यू झाल्याची घटना देखील घडल्या आहेत. अनेक लोक बेघर झाले आहेत. तर शिमल्यात भूस्खलन (Shimla Landslide) होत आहे, त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. जम्मू-काश्मीरमध्ये पावसामुळे (Jammu Kashmir Rain) अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. उत्तराखंडमधील (Uttarakhand) काही भागात हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. 


हेही वाचा:


Ashadhi Wari : 'जय हरी विठ्ठल' म्हणत पंतप्रधान मोदींनी मराठीतून दिल्या एकादशीच्या शुभेच्छा! नक्की काय म्हणाले मोदी?