मुंबई: शिवाजी पार्कनंतर दिवाळी पहाटच्यानिमित्तानं शिवसेनेचे ठाकरे (Uddhav Thackeray) आणि शिंदे गट (Eknath Shinde) पुन्हा एकदा एकमेकांच्या आमने सामने उभे ठाकले होते. ज्यात शिंदे गटाच्या बाजूनं गुणवत्तेच्या आधारावर हायकोर्टानं निकाल दिला आहे. ठाणे महापालिकेनं दिलेली परवानगी योग्य ठरवत त्याला आव्हान देणारी याचिका बुधवारी हायकोर्टानं फेटाळून लावली. न्यायालयाने ठाकरे गट, शिंदे गट आणि महानगरपालिकेचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने ठाकरे गटाची याचिका गुणवत्तेच्या निकषांवर टिकणारी नाही. त्यामुळे ही याचिका फेटाळण्यात येत आहे, असे नमूद करून न्यायालयाने ठाकरे गटाची याचिका फेटाळली.
ठाण्यातील तलावपाळी इथं होणाऱ्या दिवाळी पहाट कार्यक्रमासाठी (Diwali Musical Morning Event) शिंदे गटाला दिलेली परवानगी ही राजकीय हेतूनं प्रेरीत असल्याचा दावा करुन ठाकरे (Uddhav Thackeray) गटाचे मंदार विचारे यांनी हायकोर्टात याचिका केली होती. या कार्यक्रमासाठी आवश्यक त्या परवानग्या आपल्याकडे असूनही आपल्या परवानगी मागणाऱ्या अर्जाचा विचार महानगरपालिकेनं (Thane Municiple Corporation) केला नाही. असा आरोप या याचिकेतून करण्यात आला होता. तसेच शिंदे गटाच्या याबाबतीतील अर्जाबाबत आपल्याला कळवण्यातही आलं नसल्याचंही ठाकरे गटातर्फे हायकोर्टात सांगण्यात आलं. या कार्यक्रमासाठी शिंदे गटानं 19 सप्टेंबर रोजी परवानगी मागत अर्ज केला होता, तर ठाकरे गटानं 3 ऑक्टोबर रोजी अर्ज केला होता. त्यामुळे आधी अर्ज करणाऱ्या शिंदे गटाला आवश्यक त्या परवानग्या घेण्यास सांगण्यात आलं. त्यांनी सगळ्या परवानग्या वेळेत सादर केल्यानं त्यांना परवानगी दिली, असं ठाणे महानगरपालिकेनं याबाबत आपली भूमिका मांडताना हायकोर्टात सांगितलं.
या गोष्टीची नोंद घेत न्यायमूर्ती रमेश धनुका आणि न्यायमूर्ती कमल खाता यांच्या खंडपीठानं पालिकेची भूमिका ग्राह्य धरत त्यांचा निर्णय योग्य ठरवला. आम्हीच या ठिकाणी वर्षानुवर्षे दिवाळी पहाट आयोजित करत आलो आहोत, असा दावा शिंदे गटाच्याव तीने करण्यात आला. तर आता आम्ही खरी युवासेना असल्याचा दावा ठाकरे गटाकडून केला गेला होता. यावर कोणाची खरी युवासेना हे ठरवण्यात आम्हाला रस नसल्याचं स्पष्ट करत हायकोर्टानं आम्ही गुणवत्तेच्या आधारावर हा निकाल देत असल्याचं जाहीर केलं.
महत्त्वाची बातमी :