Crime News : एका व्यावसायिकाला मारहाण करत लाखो रुपयांची खंडणी (Extortion) मागणाऱ्या 'दाढी' बंधूंच्या विरोधात कल्याण कोळशेवाडी पोलिसांनी (Kalyan Kolsewadi Police Station) गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये रवी दाढी, किरण दाढी, सॅम खांडे, बबल्या उर्फ कृष्णा माळी अशी यांची नावे आहेत. पोलिसांनी त्यांच्यासह त्यांच्या साथीदारांचा शोध सुरु केला आहे. व्यावसायिकाला मारहाण करण्याची घटना देखील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. व्यावसायिकाला मारहाण करत दोन लाख रुपयांची खंडणी मागितली होती.


2 लाख आणून दे, अन्यथा जिवे ठार मारण्याची धमकी


दरम्यान, दाढी कंपनीची कल्याण भागात दहशत होती. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्या कारवाया थंडावल्या होत्या. आता या घटनेनिमित्त 'दाढी' कंपनी पुन्हा एकदा सक्रिय झाल्याचे दिसून येते. 
कल्याण पूर्वेतील व्यावसायिक सुरेश काळे कल्याण पश्चिमेकडील एका हॉटेलमध्ये बसले असताना त्या ठिकाणी रवी दाढी, किरण दाढी,सॅम खांडे, बबल्या उर्फ कृष्णा माळी व त्यांचे साथीदार त्या ठिकाणी आले. त्यांनी सुरेश काळे यांना विचारपूस सुरु करत ..तू सुरेश काळे आहेस ना ?....मोठ्या व्यावसायिकांसोबत तुझी पार्टनरशिप आहे. आम्हाला पण पैसे दे. इतकेच नव्हे तर या तरुणांनी सुरेश यांना मारहाण करत 2 लाख आणून दे अन्यथा जिवे ठार मारण्याची धमकी यावेळी दिली. जेव्हा सुरेश यांनी हॉटेल मधील सीसीटिव्ही तपासत विचारपूस केली, तेव्हा दादागिरी करत खंडणी मागणारे दाढी कंपनीची लोकं असल्याचे समोर आले. यानंतर सुरेश काळे यांना कल्याण पूर्वेतील कोळशेवाडी परिसरात दाढी बंधूनी हटकले खंडणी मागितली.


याबाबत सुरेश काळे यांनी कोळशेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीनुसार कोळशेवाडी पोलिसांनी रवी दाढी, किरण दाढी, सॅम खांडे, बबल्या उर्फ कृष्णा माळी यांच्या विरोधात गुन्हा दखल करत तपास सुरु केला आहे. याबाबत व्यावसायिकानं केलेल्या तक्रारीनुसार पोलीस ठाण्यात  गुन्हा दाखल केला आहे. आरोपींचा शोध सुरु असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. मात्र, कॅमेऱ्यासमोर बोलण्यास त्यांनी नकार दिला.


महत्त्वाच्या बातम्या:


Sangli Crime : दुकान मालकाने पगार न दिल्याने कामगाराची सटकली, लाखो रुपये असलेली तिजोरीच पळवून नेली; आठ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त