Shinde Group Vs Ncp: महेश तपासे (ncp spokesperson mahesh tapase ) यांनी आज पालकमंत्रीपद ठाणे जिल्ह्यातील शिंदे गटातील तीन आमदारांपैकी एकाला दिले पाहिजे होते. तसेच या तिघांच्या मतदारसंघावर भाजपचा डोळा असल्याची टीका केली होती. या टीकेला शिंदे गटातील आमदार विश्वनाथ भोईर (Mla vishwanath bhoir) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठरवलं तर ते पण होईल, राहिला प्रश्न मतदारसंघाचा तर आमचा मतदारसंघ राहील की नाही, विश्वनाथ भोईर यांचं काय होईल याची चिंता तुम्ही करू नका, असा सल्ला वजा इशारा शिंदे गटातील आमदार विश्वनाथ भोईर यांनी राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे यांना दिला आहे. त्यामुळे आता कल्याण डोंबिवलीत शिंदे विरुद्ध राष्ट्रवादीमध्ये आरोप प्रत्यारोपांचा कलगीतुरा रंगण्याची शक्यता आहे .
राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे यांनी ठाणे जिल्हा पालकमंत्रीपद शंभूराज देसाई यांना दिल्याबाबत बोलताना ठाणे जिल्ह्यात बंड केलेल्या तिन्ही आमदारांपैकी एकाला पालकमंत्री केले असते तर विकास झाला असता. या तीन आमदारांपैकी एकाला पालकमंत्रीपद द्यायला पाहिजे होते. तसेच प्रताप सरनाईक, विश्वनाथ भोईर, बालाजी किनीकर या तिघांचा मतदारसंघावर भाजपचा डोळा असल्याचे टीका केली होती.
या टीकेला शिंदे गटातील कल्याण पश्चिमचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी उत्तर दिले आहे. आमदार भोईर यांनी सध्या मत्र्यांची संख्या कमी आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी एका मंत्र्याला तीन जिल्ह्याची पालकमंत्री पदाची जबाबदारी दिली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (deputy chief minister devendra fadnavis) यांच्याकडे सहा जिल्हे आहेत. पालकमंत्री पदाबाबत सर्वस्वी निर्णय आमचे पक्ष नेते एकनाथ शिंदे यांच्या हातात आहे. त्यांनी ठरवल ते पण होईल आणि मतदारसंघाच्या विषयाबाबत महेश तपासे यांनी चिंता करण्याची गरज नाही. त्यासाठी आमचे नेते समर्थ आहेत. आम्ही सर्व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर सोपवलं आहे. त्यामुळे मतदारसंघ राहील ,विश्वनाथ भोईर यांचं काय होईल याची तपासे यांना चिंता करण्याची गरज नाही. तो आमचा अंतर्गत विषय आहे आणि तो आम्ही बघून घेवू असं ते म्हणाले आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या:
शिंदे गटातील तीन बंडखोर आमदारांच्या जागांवर भाजपचा डोळा: महेश तपासे