भिवंडी : मराठा समाजाला कुणबी म्हणून आरक्षण मिळालं तर आपला सरपंचही होणार नाही,  असं म्हणत पुन्हा एकदा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी ओबीसी सभेतून (OBC Sabha) हल्लाबोल केलाय. भिवंडीमध्ये (Bhiwandi) ओबीसी निर्धार सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. या सभेमध्ये पुन्हा एकदा भुजबळांनी आक्रमक भाषण करत मनोज जरांगेंवर (Manoj Jarange) निशाणा साधलाय. त्यामुळे जरांगे पाटील आणि भुजबळ यांच्यामधील वाक् युद्ध अजूनही सुरुच असल्याचं पाहायला मिळतंय. 


मराठा समाजाला आमचा विरोध नाही, तर आमचा विरोध हा गुंडगिरी, जाळपोळ करणाऱ्यांना आणि झुंडशाहीला आहे, असं म्हणत भुजबळांनी जरांगेंवर हल्लाबोल केला.  जरांगे पाटील म्हणतो की भुजबळ एकटा खातो, पण तु तुझ्या सासरवाडीचं खातोस, असं म्हणत भुजबळांनी मनोज जरांगे यांच्यावर जहरी टीका केली. 


छत्रपतींच्या सेनेला मराठे नाही तर मावळे म्हणायचे - छगन भुजबळ


छत्रपतींच नाव घ्यायचं आणि आमच्यावर हल्ले करायचे. छत्रपतींच्या सेनेला मराठे नाहीतर मावळे म्हणायचे. आम्ही सर्व मावळे त्यामध्ये होतो, असं  छगनब भुजबळांनी म्हटलं. इतरांना गावबंदी आणि रोहित पवारचं स्वागत. त्याबद्दल कुणी बोललं तर त्याला मारहाण केली जाते. जरांगे ओबीसीत आरक्षण मागणं, जाळपोळ करणं, गावबंदी करणं, सरकारला धमकवण चूक असल्याचं भुजबळांनी म्हटलं. 


 जाळपोळ करणाऱ्या समोर सरकार झुकतंय - छगन भुजबळ


सरकारचं शिष्टमंडळ हे मनोज जरांगे यांच्या भेटीला गेलं होतं. त्यावर देखील छगन भुजबळांनी भाष्य केलं आहे. यावर बोलताना त्यांनी म्हटलं की, सरकार किती झुकणार जरांगेसमोर. त्याच्या पाया पडतायत, त्याला विनंती करतायत. सरकारला धमकी देणाऱ्यासमोर, जाळपोळ करणाऱ्या समोर तुम्ही झुकताय, असं म्हणत भुजबळांनी सरकारवर भाष्य केलं. 


संघर्षासाठी तयार व्हा - छगन भुजबळ


संघर्षासाठी तयार होण्याचं आवाहन देखील छगन भुजबळांनी यावेळी केलं आहे. जे जे ओबीसी विरूद्ध बोलतायत त्यांना निवडणुकीत ध्यानात ठेवा. त्यांचा कार्यक्रम निवडणुकीत करा, असं थेट आवाहन भुजबळांना केलंय.  जरांगेची मीटिंग असली तर शासकीय कार्यालयाला सुट्टी दिली जाते. ही लोकशाही नाही, दादागिरी आहे. आरक्षण मिळू द्या भुजबळचा करेक्ट कार्यक्रम करतो. ये 24 डिसेंबरला नाशिकला,बघतो काय कार्यक्रम करतो, असा इशारा देखील यावेळी भुजबळांनी जरांगे पाटलांना दिला आहे. 



हेही वाचा : 


मोठी बातमी! आंतरवाली सराटीत मनोज जरांगेंच्या बैठकीला सुरवात, महत्वाच्या विषयावर चर्चा