Aditya Thackeray May Contest Kalyan Lok Sabha Elections:  कल्याण : आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) कल्याण (Kalyan) लोकसभा निवडणूक (Lok Sabha Elections 2024) लढवणार असल्याची चर्चा सध्या राजकीय (Maharashtra Political Updates) वर्तुळात रंगली आहे. या चर्चेनंतर राजकीय वातावरण तापल्याचं दिसून येत आहे. 


मनसे (Maharashtra Navnirman Sena) आमदार राजू पाटील (Raju Patil) यांनी इथल्या लोकप्रतिनिधींबाबत सर्वसामान्यांमध्ये आणि राजकीय नेत्यांमध्ये रोष आहे. त्यांना बदल हवा आहे. त्यासाठी या सर्व गोष्टी घडत आहेत. तो बदल करण्याच्या अनुषंगानं किंवा फायदा घेण्याच्या अनुषंगानं सर्व उड्या घेतायत. त्या सर्वांना शुभेच्छा असा टोला अप्रत्यक्षरीत्या खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांच्यासह आदित्य ठाकरे यांना लगावला आहे. 


कल्याण लोकसभा ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या मतदारसंघात आहे. काही दिवसांपासून कल्याण लोकसभा मतदारसंघात आदित्य ठाकरे निवडणूक लढणार आहे, अशी चर्चा सुरू झाली आहे. त्यावर मनसे आमदार राजू पाटील यांनी हे वक्तव्य केलं आहे. मनसे आमदार राजू पाटील हेदेखील कल्याण लोकसभा मतदारसंघात मनसेचा उमेदवार असल्याची चर्चा आहे. 


राजू पाटील बोलताना म्हणाले की, मी सध्या पक्षाचा उमेदवार नाही, पक्ष जी जबाबदारी देईल ती मी स्वीकारणार, प्रत्येक पक्ष आपापल्या भूमिका जाहीर करत असतो. त्यांना तो अधिकार आहे, त्यावर जास्त भाष्य करणार नाही, ज्या वेळेला आमचा पक्ष भूमिका मांडेल, ती मी आपल्यासमोर स्पष्ट करेल. आमदार राजू पाटील डोंबिवली पूर्वेतील पिसवली परिसरात माजी उपमापोर मोरेश्वर भोईर यांच्यातर्फे आयोजित भागवत कथा पुराण कार्यक्रम उपस्थित होते. त्यादरम्यान त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Maratha Reservation : आंतरवाली सराटीमधील बैठकीपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं मराठा आरक्षणाबाबत मोठं वक्तव्य