ठाणे : मध्य रेल्वेच्या (Central Railway) प्रवाशांसाठी मोठी बातमी समोर येत आहे. मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती, ती आता सुरु झाली आहे. ठाणे स्थानकात (Thane Railway Station) सिग्नल यंत्रणेत मोठा बिघाड झाल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती. ठाणे येथे सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याचं समोर आलं. त्यानंतर आता सिग्नल बिघाड दुरुस्त झाला असून रेल्वे सेवा सुरु झाली आहे. मात्र, लोकल अद्यापही उशिराने धावत आहेत. मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावरील कल्याण ते कुर्ला दरम्यान वाहतूक सेवा विस्कळीत झाली होती. सोमवारी आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मध्य रेल्वेच्या वाहतुकीचे तीनतेरा वाजल्याचं पाहायला मिळाल, यामुळे भर उन्हात प्रवाशांवर ट्रॅकवरुन चालण्याची वेळ आली. तर, स्थानकावरही प्रवाशांची गर्दी झाली होती.


मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत


ठाणे स्थानकात सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने आठवड्याच्या पहिल्याच दिवशी प्रवाशांचे हाल होताना पाहायला मिळालं. ठाणे स्थानकात सकाळी 10 वाजेच्या सुमारास सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याची माहिती आहे. दरम्यन हा तांत्रिक बिघाड सुमारे एक तासानंतर दुरुस्त झाल्याने लोकल सेवा पुन्हा सुरु झाली आहे. ठाणे स्थानकात सर्व मार्गावरील सिग्नल यंत्रणेत तांत्रिक बिघाड झाल्याने लोकल सेवा ठप्प झाली होती. यामुळे प्रवाशांचे चांगलेच हाल होताना दिसत आहे. दरम्यान, लोकल सुरु झाली असली तरी उशिराने धावत आहे. दरम्यान, रेल्वे सेवा ठप्प काही काळ झाल्यामुळे ठाणे स्थानकात प्रवाशांची गर्दी पाहायला मिळाली. 


ठाणे स्थानकात सिग्नल यंत्रणेत मोठा बिघाड


मध्य रेल्वेने अधिकृत एक्स मीडिया अकाऊंटवरून पोस्ट करत याबाबत माहिती देताना सांगितलं होतं की, मध्य रेल्वेवर ठाण्यातील सर्व मार्गांवर सिग्नल बिघाडामुळे कल्याण ते कुर्ला दरम्यानची सेवा प्रभावित झाली आहे. रेल्वेचे कामकाज पूर्वपदावर आणण्यासाठी प्रशासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत.


बिघाड दुरुस्त मात्र, लोकल अद्यापही उशिराने


ठाणे स्टेशन दरम्यान सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्यामुळे लोकल वाहतुकीवर परिणाम झाला आहे. मध्य रेल्वेवर ठाण्याजवळ झालेला सिग्नलमधील तांत्रिक बिघाड दुरुस्त झाला आहे. मात्र, लोकल सेवा अद्यापही उशिरानेच सुरु आहे.


पाहा व्हिडीओ : मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, ठाणे स्थानकात सिग्नल यंत्रणेत मोठा बिघाड