Dombivlikars Protest Against KDMC : डोंबिवली (Dombivli) शहरातील रस्ते अस्वच्छता अशा विविध समस्यांबाबत (20 ऑक्टोबर) नागरिक रस्त्यावर उतरले. गुरुवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास डोंबिवलीत पहिल्यांदाच डोंबिवली स्टाईलने आंदोलन झालं. रात्री आठ ते आठ वाजून पाच मिनिटांपर्यंत ब्लॅक आऊट, याच वेळात जमेल तिथे शंख नाद किंवा थाळी वाजवा, असं आवाहन या आंदोलनासाठी एका मेसेजच्या माध्यमातून करण्यात आल होतं. विशेष या आंदोलनाला कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नव्हती. त्यामुळे या मेसेजची चर्चा रंगली होती. या आवाहनाला प्रतिसाद देत काल डोंबिवली पूर्वेकडील फडके रोड इथे अनेक नागरिक रस्त्यावर उतरले.


डोंबिवलीतील खड्डे जगात भारी असं असे लिहिलेले टी-शर्ट घालून नागरिकांनी थाळी वाजवून, टाळ वाजवून, घंटा वाजवून कल्याण डोंबिवली महापालिका (KDMC) प्रशासनाचा निषेध व्यक्त केला. यावेळी रस्त्यांची डागडुजी करण्यापेक्षा रस्त्यांवर खड्डे पडणार नाहीत असे रस्ते बनवा. आम्ही करदाते आहोत. आम्हाला सोयीसुविधा उपलब्ध करुन द्या, अशी मागणी यावेळी नागरिकांकडून करण्यात आली. यावेळी नागरिकांच्या स्वाक्षऱ्या देखील घेण्यात आल्या. दरम्यान आपल्या कार्यालयातील लाईट बंद करत मनसेने देखील या आंदोलनाला पाठिंबा दिल्याचे दिसून आले. तर याबाबत हा आंदोलनाचा पहिला टप्पा आहे जर नागरिकांना सुविधा मिळाल्या नाहीत तर पुढील टप्प्यात आणखी मोठ आंदोलन करण्यात येईल असं इशारा देखील यावेळी देण्यात आला.


ते आंदोलन काही विघ्नसंतोषी लोकांकडूनच, शिंदे गटाचा आरोप
दुसरीकडे सत्ताधारी असलेल्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी काल पत्रकार परिषद घेत हे आंदोलन काही विघ्नसंतोषी लोकांकडून करण्यात येत असल्याचा आरोप केला आहे. या आंदोलनांबाबत बोलताना युवासेना पदाधिकारी दीपेश म्हात्रे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून कल्याण डोंबिवलीत अनेक विकासकामे सुरु असल्याचं सांगितलं. "दिवाळीपर्यंत खड्डेमुक्त रस्ते आणि स्वच्छ शहर देण्यासाठी पालिकेच्या कर्मचाऱ्यांसह अधिकारी, महापालिका आयुक्त देखील रस्त्यावर उतरले आहेत. हे सगळं होत असताना  काही जे विघ्नसंतोषी लोकांनी रात्री आठ ते आठ वाजून पाच मिनिटांपर्यंत ब्लॅकआऊट करण्याचा निर्णय डोंबिवलीमध्ये घेतला. मी या दुर्दैवी लोकांना सांगेन की त्यांना विकासाची जी दृष्टी आहे ती दिसत नसेल आणि  दिवाळीसारख्या चांगल्या सणाच्या दिवशी डोंबिवलीला बदनाम करण्याचं कामही काही विघ्नसंतोषी लोक करत असतील तर आम्ही त्यांचा जाहीरपणे निषेध करतो. येत्या काळामध्ये डोंबिवलीत  विकास दिसेल विकासाची घोड दौड कुठेही थांबणार नाही," असं दीपेश म्हात्रे यांनी सांगितले.


इतर महत्वाची बातमी


Kalyan : एपीएमसी मार्केटमधील फूल मार्केट जमीनदोस्त, उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार प्रशासनाची कारवाई