Crime News: पत्नी सोडून गेली मात्र पत्नी सासूमुळे  सोडून गेली, असा समज करून घेत एका जावयाने सासूला धडा शिकवण्यासाठी एक वेगळीच शक्कल लढवली. या जावयाने चक्क स्वतःच्या अपहरणाचा बनाव रचला. मात्र हा बनाव रचणे आता या व्यक्तीच्या अंगाशी आला आहे. कोळशेवाडी पोलीस ठाण्यात या व्यक्तीच्या पहिल्या पत्नीने अपहरणाचा गुन्हा दाखल केला. दुसरी पत्नी मुस्लिम असल्याने या बहाद्दर जावयाने चक्क बुरखा परिधान केला. जेणेकरून संशय सासुवर येईल. मात्र कोळशेवाडी पोलिसांनी या बनावट अपहरणाचा पर्दाफाश केला. बहाद्दर जावयी संदीप गायकवाड व त्याचे साथीदार जावेद खान, आकाश अभंग आणि अवी पाटील यांना अटक करण्यात आली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण पूर्व भागातील तीस गाव नाका परिसरात संदीप गायकवाड हा आपल्या दोन पत्नीसह राहत होता. संदीपचे अपहरण झाल्याची तक्रार संदीपच्या पहिल्या पत्नीने कोळशेवाडी पोलीस ठाण्यात दाखल केली होती. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला, मात्र त्याचे खरंच अपहरण झाले का? याबाबत पोलिसांना देखील संशय होता. त्यादृष्टीने कोळशेवाडी पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेंद्र देशमुख यांनी एपीआय हरिदास बोचरे व पगारे यांचे  पथक या गुन्ह्याचे उकल करण्यासाठी नेमले. तपासाअंती समोर आलेल्या माहितीमुळे पोलीस देखील चक्रावले.


संदीपची दुसरी पत्नी काही कारणामुळे त्याला सोडून निघून गेली. आपली पत्नी सासूमुळेच आपल्याला सोडून निघून गेल्याचा संशय संदीपला होता. त्यामुळे सासू बद्दलचा संताप व पत्नीचा विरह यामुळे संदीपने सासूला धडा शिकवायचे ठरवले. तसेच पत्नीकडून सहानुभूती मिळवण्यासाठी त्याने प्लान आखला होता. या सर्व प्रकरणात संदीप गायकवाड याला त्याचे साथीदार जावेद खान, आकाश अभंग आणि अवि पाटील यांनी साथ दिली. संदीपचे अपहरण त्याच्याच सासूने केला आहे, असा संशय पोलिसांना यावा म्हणून त्यांनी या नाट्या दरम्यान बुरखा देखील घातला होता. हा सर्व खेळ आठवडाभर सुरु होता. मटार आठवडाभराच्या तपासानंतर हा अपहरणाचा बनाव असल्याचा उघड झालं. या प्रकरण उघडकीस आणण्यासाठी पोलिसांची आठवडाभर चांगलीच कसरत झाली. दरम्यान, पोलीस याप्रकरणी पुढील कारवाई करत आहे.


इतर महत्वाच्या बातम्या: 


Kolhapur Crime : गेट टुगेदरला भेटला आणि म्हणाला शरीरसंबंध ठेव! वर्गमैत्रिणींशी अश्लील संभाषण करणाऱ्या वकीलाविरोधात कोल्हापुरात गुन्हा दाखल