ठाणे : मंगळवारचा दिवस उजाडला तो एका धक्कादायक बातमीने. आकाश शिंदे हा नराधम,  ज्या शाळेत सफाईचं काम करायचा त्याच शाळेतील चिमुकल्या मुलींवर त्याने अत्याचार केला. या घटनेनंतर बदलापूरकरांच्या असंतोषाचा उद्रेक झाला आणि त्यांनी बदलापूर रेल्वे ट्रॅकरवच आंदोलन सुरू केलं. आरोपीला आजच फाशीची शिक्षा द्या, तोपर्यंत माघार घेणार नाही अशी भूमिका आंदोलकांनी घेतली. शेवटी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला आणि आंदोलकांना पांगवण्यात आलं. 


सकाळी 6.30 च्या दरम्यान पालकांनी शाळेला भेट दिली आणि तेव्हापासून सुरू झालेलं आंदोलन संध्याकाळी 5.30 पर्यंतसुरू राहिलं. या दरम्यान बदलापूर रेल्वे ट्रॅक आंदोलकांनी अडवल्याने कोणतीही गाडी पुढे जाऊ शकली नाही. शेवटी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. 


Badlapur Protest Timeline : बदलापूरमध्ये दिवसभर काय घडलं हे पाहुयात, 


सकाळी 6.30 वाजता


विद्यार्थिनींवर झालेल्या अत्याचाराविरोधात संतापलेले पालक शाळेबाहेर जमा होण्यास सुरूवात झाली. 


सकाळी 7.30 वाजता


आंदोलनाचं लोण पसरलं आणि शाळेबाहेर शेकडो बदलापूरकरांची गर्दी झाली. यावेळी शाळा प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू झाली. 


सकाळी 8.30 वाजता


आंदोलन शाळेपुरतं मर्यादीत न राहता आंदोलकांची बदलापूर रेल्वे स्टेशनकडे कूच, 


सकाळी 9.15 वाजता 


आंदोलक बघताबघता रेल्वे रूळांवर उतरले. मध्य रेल्वेची दोन्ही बाजूंची वाहतूक ठप्प झाली. 


सकाळी 12.00 वाजता


रेल्वे पोलीस आयुक्त रवींद्र शिसवे यांची बदलापुरात धाव. 


सकाळी 12.20 वाजता


रेल्वे पोलीस आयुक्त रवींद्र शिसवे यांचं आंदोलनाना अपील, समजूत घालत आंदोलकांना रेल्वे रूळ सोडण्याचं आवाहन. परंतु माघार घेण्यास आंदोलकांचा ठाम नकार. आरोपीला फाशीची शिक्षा देण्याच्या मागणीवर आंदोलक ठाम, फाशीचा दोर घेऊन आंदोलक रेल्वेरूळांवर. 


दुपारी 12.45 वाजता 


आंदोलकांची पुन्हा जवळच असलेल्या संबंधित शाळेकडे कूच, शाळेचं गेट तोडत आंदोलक शाळेत घुसले, शाळेत प्रचंड तोडफोड करण्यात आली. 


दुपारी 1.00 वाजता 


रेल्वे रूळांवरील आंदोलकांची प्रचंड घोषणाबाजी, आंदोलकांना पांगवण्याचे पोलिसांचे प्रयत्न. आंदोलकांकडून दगडफेक, दगडफेकीत काही पोलीस आणि आंदोलक जखमी. 


दुपारी 1.10 वाजता


शाळेबाहेर आंदोलन करणाऱ्यांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून अश्रूधुराच्या नळकांड्यांचा वापर. 


दुपारी 1.30 वाजता 


पोलिसांकडून पुन्हा आवाहन, मात्र आंदोलकांचा रेल्वे स्थानकावरच ठिय्या. 


दुपारी 2.00 वाजता 


ठाण्याचे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे बदलापुरात दाखल. बदलापुरात आशुषोष डुंबरेंकडून पाहणी. 


दुपारी 2.30 वाजता 


आंदोलकांची आयुक्तांसमोर तुफान घोषणाबाजी, फाशी फाशी, वुई वॉण्ट जस्टीसच्या घोषणा. 


दुपारी 3.00 वाजता 


आयुक्त डुंबरे यांचं आंदोलकांच्या कलाने घेत आंदोलन मागे घेण्याचं आवाहन. 


दुपारी 3.30 वाजता 


आंदोलक अजूनही आंदोलनावर ठाम. हजारोंच्या संख्येने आंदोलक रेल्वे रूळांवर उतरले. 


दुपारी 3.45 वाजता


मंत्री गिरीश महाजन आंदोलनस्थळी, दोषींवर कडक कारवाईचं आश्वासन. तक्रार घेण्यास दिरंगाई करणाऱ्या पोलिसांना निलंबित करण्याचं आश्वासन. 


दुपारी 4.00 वाजता


गिरीश महाजनांसमोर आंदोलक आक्रमक, आंदोलकांची प्रचंड घोषणाबाजी. पीडितांना न्याय देण्याची मागणी.


दुपारी 4.30 वाजता


कारवाईत विलंब करणारे बदलापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आणि हेडकॉन्स्टेबल यांना तत्काळ निलंबित करण्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेश. 


संध्याकाळी 5.50 वाजता


बदलापूर रेल्वे स्टेशनवर आंदोलकांवर पोलिसांचा लाठीचार्ज. रेल्वे पोलीस, राज्य राखीव पोलीस दलासह बदलापूर पोलिसांनी लाठीचार्ज करत स्टेशनवरील आंदोलकांना पांगवलं. 


ही बातमी वाचा: