Badlapur Crime: ठाण्यातील बदलापूरमधील दोन अल्पवयीन विद्यार्थिनींवर शाळेतील स्वच्छातागृहात कर्मचाऱ्याने केलेल्या लैंगिक अत्याचाराने आज देशभर संतापाची लाट उसळली आहे. सफाई कामगार म्हणून नेमणूक केलेल्या आरोपीनेच घृणास्पद कृत्य केल्याने बदलापूरकरांनी रेल्वेस्थानकावर आंदोलन सुरु केले आहे. ठाण्यातील या लैंगिक अत्याचाराची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने गंभीर दखल घेतली आहे. राज्याचे मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालकांना नोटीस बजावण्यात आली असून FIR नोंदवण्यात उशीर का झाला? याचे स्पष्टीकरण मागितले आहे. दोन आठवड्याच्या आत याविषयीचा सविस्तर अहवाल मागवण्यात आला आहे.राष्ट्रीय बालहक्क आयोगानंतर सलग दुसऱ्या राष्ट्रीय आयोगाकडून या अत्याचाराची दखल घेण्यात आली आहे. 


मानवी हक्कांच्या उल्लंघनाचे गंभीर मुद्दे उपस्थित


मानवी हक्कांच्या उल्लंघनाचे गंभीर मुद्दे उपस्थित केले आहेत.  त्यानुसार, त्यांनी मुख्य सचिव आणि महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक यांना नोटीस बजावून एफआयआर नोंदवण्यात विलंबाचे कारण, त्याची स्थिती आणि पीडित मुलींच्या आरोग्यासह या प्रकरणाचा तपशीलवार अहवाल मागवला आहे.अधिकारी किंवा शाळा व्यवस्थापनाने पीडितांना कोणतेही समुपदेशन केले आहे का? हे देखील आयोगाला जाणून घ्यायचे आहे. अहवालात अशा घटनांची पुनरावृत्ती होणार नाही याची खात्री करण्यासाठी उचललेल्या/प्रस्तावित केलेल्या पावलांचा देखील उल्लेख केला पाहिजे.  दोन आठवड्यांत आयोगाला संबंधित अधिकाऱ्यांकडून प्रतिसाद अपेक्षित आहे.


एफआयआरची नोंद करण्यास 12 तास उशीर!


ठाणे जिल्ह्यातील एका शाळेतील कर्मचाऱ्यांनी लैंगिक शोषण केले होते. महाराष्ट्राचे.  तो शाळेतील मुलींच्या शौचालयाची साफसफाई करण्यात गुंतला होता, जिथे त्याने 12-13 ऑगस्ट, 2024 रोजी कथितपणे त्यांचा बळी घेतला. अहवालानुसार, मुलींच्या स्वच्छतागृहाच्या साफसफाईसाठी महिला कर्मचारी सदस्याला का नियुक्त करण्यात आले नाही असा प्रश्न पालकांनी उपस्थित केला आहे.  कथितरित्या, त्यांनी या प्रकरणी पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर एफआयआरची नोंद करण्यास जवळपास 12 तास उशीर झाला.


शाळेचा बेजबाबदारपणा, हैवानालाच कामावर ठेवलं


1 ऑगस्टला 24 वर्षीय आरोपीची शाळेत नेमणूक झाली. त्याच्यावर लहान मुलींना वॉशरूमला नेण्याची जबाबदारी देण्यात आली होती. अल्पवयीन मुलींसोबत 12 आणि 13 ऑगस्टला घृणास्पद कृत्य घडल्याचं एका मुलीने सांगितलं. गुरूवार 14 ऑगस्ट रोजी पीडित 4 वर्षीय दोन मुलींपैकी एकीने तिच्या आजोबांकडे तिने आपल्या प्रायवेट पार्टजवळ त्रास होत असल्याचं सांगितलं, तेच तिने तिच्या आईकडेही सांगितलं. नंतर त्यांनी एका खासगी डॉक्टरच्या माध्यमातून वैद्यकीय तपासणी केली असता डॉक्टरने दोन्ही मुलींसोबत लैंगिक अत्याचार झाला असल्याचं सांगितलं. बदलापूरमधील नावाजलेल्या शाळेत शिकणाऱ्या दोन मुलींवर अत्याचार झाला. यातील एक चिमुकली चार वर्षांची, तर दुसरी सहा वर्षांची असल्याची माहिती मिळत आहे. शाळेत नुकत्याच सफाई कामगार म्हणून रूजू झालेल्या अक्षय शिंदे नावाच्या 23 वर्षांच्या नराधमानं चिमुकल्यांच्या अजाणतेपणाचा फायदा घेऊन त्यांच्यासोबत पाशवी कृत्य केलं. ही घटना 12 ऑगस्टची आहे. त्या दिवशी सकाळचे वर्ग सुरू असताना घडली. 


हेही वाचा:


Badlapur : महाभयंकर! नराधमाकडेच चिमुकलींना वॉशरुमला नेण्याची जबाबदारी, शाळेच्या कारनाम्याचा कहर