अंबरनाथ : मुक्या जनावरांवर प्रेम करा.. त्यांना त्रास देऊ नका असं आवाहन केलं जाते पण त्याच मुक्या जनावरासाठी वाद घालताना माणूसच माणूसकी सोडून वागतो याचे उदाहण म्हणजे अंबरनाथमधील ( Ambernath News) घटना आहे. एका श्वानाच्या पिल्लासाठी दोघांमध्ये तुफान राडा झालाय. ज्यात दोघंही जखमी झालेत. दरम्यान या मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.


अंबरनाथच्या रहिवासी असलेल्या अमित रेवाले ला रस्त्यावरून जात असताना श्वानाचे पिल्लू दिसले त्या पिल्लाला काही लोक त्रास देत होते.  अमितने या पिल्लाची त्यांचा तावडीतून सुटका करून सोशल मीडियाच्या माध्यमातून अॅडोप्शनसाठी आवाहन केलं. अमितच्या या आवाहनाला प्रतिसाद देत बदलापूरच्या दोन तरुणीने संपर्क साधला. मात्र अमित आणि या दोन्ही बहिणी भेटल्यावर  त्यांच्यामध्ये बाचाबाची झाली आणि या दोन्ही बहिणीने अमितला मारहाण केल्याचा आरोप अमित रेवाले यांनी केला आहे.


दोघांमध्ये तुफान राडा


श्वानाचे पिल्लू हिना जाधव यांना न दिल्यानेच त्यांनी मला मारहाण केल्याचा आरोप अमित रेवालेंनी केलाय. पण जाधव भगिनी मात्र वेगळंच काहीतरी सांगत आहे. या प्रकरणी जेव्हा हिना जाधव आणि तिचा बहिणीला विचारला असता त्यांनी वेगळीच बाजू मांडली.  अनुप हा श्वानाचे पिल्लू विकण्याच्या बहाण्याने पैशांची लूट करत होत. तसेच त्या पिल्लूसोबत काहीतरी चुकीचा करत होता अस आरोप हिना जाधव यांनी अमितवर केला आहे.


अंबरनाथ पोलीस स्थानकात गुन्हा दाखल


या घटनेनंतर हिना आणि अमित हे दोघे अंबरनाथ पोलीस ठाणे गाठले आणि एकमेकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसात तक्रार केली. मात्र पोलिसांनी पाहिले सविस्तर घटनाक्रम समजून आणि या दोघांना काय कारवाई करावं याचा विचारात आहे. आता खरं कुणाचं आणि खोटं कुणाचं हे पोलीस तपासातूनच स्पष्ट होईलपण एक मात्र नक्की कायदा हातात घेणं आणि दादागिरी करणं हा सुद्धा गुन्हाच आहे


मुंबईतील उच्चभ्रू सोसायटीत कुत्र्यांची दहशत


सीसीटीव्हीमध्ये चित्रित झालेल्यांपैकी एका घटनेत कुत्र्यांनी लहान मुलावर हल्ला केल्याचं दिसून येत आहे. एक लहान मूल सोसायटीच्या पार्किंग एरियातून जात होते, त्यादरम्यान कुत्र्यांनी मुलावर हल्ला केला. सुदैवाने आजूबाजूच्या लोकांनी मुलाला कुत्र्यांपासू वाचवले. दुसऱ्या सीसीटीव्हीमध्ये एक महिला 7 महिन्यांच्या बाळाला घेऊन जात होती, त्यादरम्यान या महिलेवर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केल्याची घटनाही चित्रित झाली आहे. 


हे ही वाचा :


 मांजरींसोबत खेळतो, मागे लागतो म्हणून महिलेचा कुत्र्यावर अॅसिड हल्ला; एक डोळा निकामी झालेल्या कुत्र्यावर उपचार सुरु