Bhiwandi Fire : भिवंडी शहरातील पिराणी पाडा  (Pirani Pada  Bhiwandi) परिसरात फळांच्या कॅरेटला अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली. ही घटना मध्यरात्रीच्या सुमारास घडली. बघता बघता या आगीने रौद्ररुप धारण केले आणि शेजारच्या तीन मजली इमारतीला देखील आग लागली. यामुळं परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झाले. दरम्यान, स्थानिकांच्या मदतीनं या इमारतीमधील रहिवाशांना सुखरुप बाहेर काढले आहे. 


एका तासाच्या प्रयत्नानंतर आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यात यश


दरम्यान, आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. एका तासाच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यात अग्निशामक दलाला यश आले आहे. दरम्यान, या आगीच्या घटनेदरम्यान, एक पोलीस कर्मचारी खड्ड्यात पडल्याने जखमी झाला आहे.


महत्त्वाच्या बातम्या: 


Hawaii Wildfires : हवाई बेट आगीच्या भक्ष्यस्थानी! अमेरिकेच्या बेटावर जंगलात वणवा, भीषण आगीत 80 जणांचा मृत्यू तर शेकडो नागरिक बेपत्ता