मुंबई : झोपो या चीनमधील मोबाईल कंपनीने भारतात आपला नवा स्मार्टफोन 'कलर F2' लॉन्च केला. झोपोच्या स्मार्टफोनमध्ये मल्टी फंक्शन फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. या स्मार्टफोनची किंमत 10 हजार 790 रुपये आहे.
झोपो कलर F2 चे फीचर्स :
- 5.5 इंचाचा एचडी स्क्रीन एचडी (720×1280 पिक्सेल रिझॉल्युशन)
- 2 जीबी रॅम
- 64 बिटचा क्वाड-कोर मीडियाटेक MT6737 चिपसेट
- 8 मेगापिक्सेल रिअर कॅमेरा
- 5 मेगापिक्सेल फ्रंट फेसिंग कॅमेरा
- 16 जीबी इंटरनल स्टोरेज
- अँड्रॉईड 6.0 मार्शमॅलो ऑपरेटिंग सिस्टिम
- 4G LTE सपोर्ट कनेक्टिव्हिटी
कलर F2 स्मार्टफोनचं सर्वात आकर्षक फीचर म्हणजे मल्टी फंकशन फिंगरप्रिंट सेन्सर असून, यूझर्स व्हिडीओ आणि ऑडिओ प्लेबॅक कंट्रोल करु शकतात. झोपो कलर F2 मध्ये 2300mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे.