नवी दिल्ली : लेनोव्हेने फॅब सीरिजचा फॅब 2 प्लस हा बहुप्रतिक्षित स्मार्टफोन लाँच केला आहे. अमेझॉनवर सध्या 14 हजार 999 रुपयांमध्ये या फोनची विक्री चालू आहे. काही दिवसांपूर्वी लाँच झालेल्या फॅब 2 या फोनचं हे अपडेटेड व्हर्जन आहे.


फोटो : लेनोव्हो

लेनोव्हो फॅब 2 चं वैशिष्ट्य म्हणजे याला मेटल बॉडी आणि 6.4 इंच एवढ्या मोठ्या आकाराची एचडी स्क्रीन देण्यात आली आहे. यामध्ये डीएसएलआर इफेक्टप्रमाणे सुविधा देण्यात आल्याने हा कॅमेरा फोन असल्याचं बोललं जात आहे.

फॅब 2 प्लस चे फीचर्स

अँड्रॉईड 6.0 सिस्टीमवर चालणाऱ्या या फोनमध्ये 6.4 इंच आकाराची एचडी स्क्रीन आहे. याशिवाय 3 GB रॅम आणि 32 GB इंटर्नल स्टोरेज आहे. तर 13 मेगापिक्सेल रिअर कॅमेरा आणि 8 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा आहे. या फोनला दोन रिअर कॅमेरे देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे दोन्हीही कॅमेरे 13 मेगापिक्सेलचे आहेत.

या फोनला 4050mAh एवढ्या दमदार क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. व्हिडिओ, ऑडियो क्वालिटी आणि कॅमेरा या फोनचं खरं आकर्षण आहे.