मुंबई : झेन कंपनीने आपला नवा स्मार्टफोन "सिनेमॅक्स 3" बाजारात आणला आहे. सँडस्टोन फिनीशसोबत काळ्या रंगातील या फोनची किंमत 5,499 आहे. या फोनची विक्री रिटेल स्टोअर आणि ई-कॉमर्स साईट्सवर सुरू आहे.


 

या मोबाईलसह 499 रूपयांमध्ये प्रोटेक्शन कीट मिळणार आहे, ज्यात स्क्रीन गार्डसोबतच प्रोटेक्टिव्ह केसही दिली जाणार आहे. हा फोन अॅक्वा फिश, कार्बन ऑरा पॉवरसारख्या स्मार्टफोनना टक्कर देणार आहे.

 

"सिनेमॅक्स 3" फिचर्स

 

डिस्प्ले- 5.5 FWVA IPS डिस्प्ले

प्रोसेसर- 1.3 GHz क्वाड कोअर प्रोसेसर

रॅम- 2जीबी

मेमरी- 16जीबी इंटर्नल मेमरी

कॅमेरा- 5 मेगापिक्सेल रिअर कॅमेरा आणि 3.2 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा

बॅटरी- 2900 mAh

कनेक्टिविटी- 3जी, ब्लूटूथ आणि वायफाय

ओएस- अँड्रॉइड लॉलिपॉप 5.1