नवी दिल्ली : गेल्याच महिन्यात सोनीच्या अपकमिंग एक्सपीरिया सीरीजमधील या स्मार्टफोनचे फोटो 'लाईव्ह फोटो यूजर्स एजंट' या प्रोफाईलवर लीक झाले.

 

आता प्रसिद्ध टिपस्टर @Oneleaks ने या अपकमिंग फोनचे फोटो ट्विटरवर शेअर केले आहेत. या फोटोनुसार, फोनच्या डाव्या बाजूला पॉवर बटण आहे. या फोनचे चारही कोपरे कर्व्ड असून, यात फिंगरप्रिंट सेंसर आहे.

 

फोनमध्ये ड्यूअल टोन LED flash आणि यूएसबी टाईप सी पोर्ट असेल. या फोनचे नाव XperiaXR असे असण्याची शक्यता आहे.

 




 

या स्मार्टफोनमध्ये 5.1 इंचाचा क्वाड-कोर स्नॅपड्रॉगन 820 64 बिट 14nm प्रोसेसर असण्याची शक्यता आहे. फोनमध्ये 3GB रॅम, 32GB इंटरनल मेमरी असेल, ती 200GB पर्यंत वाढवता येऊ शकते. तसेच या डिव्हाइसमध्ये अॅन्ड्रॉइड 6.0 मार्शमॅलो सॉफ्टवेअर आणि 23 मेगापिक्सल रिअर कॅमेरा एक्समॉस आरएस सेंसरसोबत असण्याची शक्यता आहे.

 


सोनी आपले अपकमिंग मॉडेल F8331 आणि F8332 हे येत्या सप्टेंबरपर्यंत बाजारात लाँच करण्याची शक्यता आहे.