नवी दिल्ली : जगातील सर्वात मोठी व्हिडिओ स्ट्रिमिंगॉ प्लॅटफॉर्म असलेले YouTube सुमारे तासभर थांबल्यानंतर युट्युबर्सचा एकच गोंधळ उडाला. व्हिडीओ पाहू शकत नसल्याच्या तक्रारी युजर्सने केल्या. यानंतर यूट्यूबने देखील ट्वीटद्वारे सेवा थांबल्याची माहिती दिली.
वेबसाइट डाउनडिटेक्टरने दिलेल्या माहितीनुसार, व्हिडिओ प्ले होत नसल्याची तक्रार 90 % लोकांनी केली . त्याच वेळी काही लोकांना लॉग इन करण्यात समस्या होती. समाज माध्यमांवर अनेकांनी त्यांचा याबद्दलचा अनुभव शेअर केला आहे. यूट्यूबवर व्हिडओ प्ले होताना येणाऱ्या एररचे स्क्रीनशॉट सोशल मीडियावर टाकले जात होते. ट्विटरवर तर #YouTubeDOWN हॅशटॅगही ट्रेण्ड होते.
यूजर्सच्या प्रतिक्रियानंतर युट्यूबने ट्वीट करत आपली बाजू मांडली. युट्यूबने म्हटले की, "गेल्या एक तासापासून युजर्सला समस्या येत असल्याच्या तक्रारी येत आहे. आम्ही या समस्या सोडवल्या असून आता युजर्स कोणत्याही अडथळ्याशिवाय आपले आवडते व्हिडीओ युट्यूबवर पाहू शकतात. यापुढे कोणतीही समस्या आल्यास तुम्ही आम्हाला संपर्क करा".