Google I/O 2021: मागील वर्षी गुगलच्या डेव्हलपर संमेलनाला रद्द करण्यात आलं होतं. पण, यंदा मात्र ते आयोजित करण्यात आलं. ज्यामध्ये कंपनीकडून काही महत्त्वाच्या आणि मोठ्या घोषणा करण्यात आल्या. आतापर्यंत या संमेलनामध्ये काही महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या.
More Inclusive Camera: गुगलच्या म्हणण्यानुसार त्यांच्याकडून एक असा स्मार्टफोन कॅमेरा तयार करण्यात आला असून, तो स्कीन टोन म्हणजेच त्वचेच्या रंगाचा पोत अचूकपणे टीपणार आहे. गुगलच्या सांगण्यानुसार नॅचरल ब्राऊन या रंगासाठी त्यांच्याकडून ऑटो व्हाईट बॅलेंसमध्ये बदल करण्यात येत आहेत. यंदाच्या वर्षी येणाऱ्या Google Pixel मध्ये हा कॅमेरा देण्यात येणार आहे.
AI-curated Albums: Apple आणि Facebook प्रमाणंच Google Photos कलेक्शनला क्युरेट करण्यासाठी AI चा वापर करणार आहे. यानंतर हे युजर्सशी शेअर करण्यात येणार आहे. गुगलच्या म्हणण्यानुसार, युजर्सच्या स्पेसिफिक इमेजेस आणि वेळ वाचवण्यासाठी यामध्ये विशेष काळजी घेण्यात येत आहे. याशिवाय कंपनी little patterns फिचरही देत आहे. सध्याच्या घडीला कंपनीकडून cinematic moments वरही काम करत आहे. Apple च्या लाईव्ह फोटोप्रमाणे हे फिचर असणार आहे.
'वर्क फ्रॉम होम'मुळे गुगलला मोठ्या प्रमाणात फायदा, एका वर्षात 7400 कोटी रुपयांची बचत
Inclusive language: गुगलने नव्यां लाँच केलेल्या आणखी एका फिचरचं नाव आहे, Smart Canvas. हा एक प्रकारचा अम्ब्रेला प्लॅटफॉर्म आहे जो Google डॉक्स, मीट, शीट्स, टास्क आणि स्लाइड यांना आपापसात जोडतो. यामध्ये Assisted Writing हा आणखी एक फिचरही आहे ज्यामध्ये जेंडर्ड टर्म्सला फ्लॅग करेल.
Android 12: गुगलने Android 12 हा आतापर्यंतचा सर्वात मोठा बदल असणार आहे. यामध्ये नवे प्रायवसी फिचर्स देण्यात आल्या आहेत. अॅप्स युजरची किती माहिती वापरू शकतात यावर नियंत्रण देण्याची मुभा गुगल युजर्सना देणार आहे. Android 12 मध्ये वेगवेगळे अॅप्स वेगवेगळ्या रंगांमध्ये दाखवण्यात येणार आहे. यामध्ये कलर पॅलेट बनवता येणार आहे, तो बॅग्राऊंडला कॉम्प्लिमेंट करु शकणार आहे.
3D Video Conferencing: गुगलने केलेल्या घोषणेमध्ये सांगितल्यानुसार व्हिडीओ चॅट सिस्टीमवरही काम सुरु आहे. ज्यामाध्यमातून तुम्ही ज्यांच्याशी संवाद साधत आहात ते तुम्हाला 3डी मध्ये दिसणार आहेत. या प्रोजेक्टला Starline असं नाव देण्यात आलं आहे.