How to Earn From Youtube Shorts : सध्या डिजिटल माध्यमातून क्रिएटिव्ही दाखवून पैसे कमाविण्याची रेलचेल सुरु आहे. अशातच तुम्हीसुद्धा क्रिएटिव्ह असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. आता तुम्ही YouTube वर छोटे व्हिडिओ बनवून महिन्याला लाखो रुपयांची कमाई करू शकता. खरंतर, YouTube शॉर्ट्स प्लॅटफॉर्मच्या विस्तारा अंतर्गत क्रिएटिव्ह्सना कमाई करण्याची संधी देत ​​आहे. YouTube Shorts सप्टेंबर 2020 मध्ये लाँच झाले. 2 वर्षांपेक्षा कमी कालावधीत, 5 ट्रिलियन व्ह्यूजचा पराक्रम यू ट्यूबने पार केला आहे. या प्लॅटफॉर्मवरून तुम्हीही पैसे कसे कमवू शकता. ते कसे हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 


जास्तीत जास्त क्रिएटिव्ह्स जोडण्याचा प्रयत्न


रिपोर्ट्सनुसार, YouTube ने 2021-2022 मध्ये Youtube Shorts साठी सुमारे 748.71 कोटी रुपयांचा निधी उभारला आहे. हा निधी केवळ या यूट्यूबचे फॉलोअर्स जास्तीत जास्त संख्येने वाढविण्यासाठी आहे. अशा परिस्थितीत, कोणतेही यूट्यूबर क्रिएटिव्हस शॉर्ट्स व्हिडिओ बनवून या संधीचा लाभ घेऊन पैसे कमवू शकतात. ज्यांच्या कंटेंटला चांगले व्ह्यूज (views) मिळतात आणि त्यांच्या चॅनलवर लोकांचा सहभागही जास्त असतो अशा शॉर्ट्स क्रिएटिव्ह्सशी YouTube दर महिन्याला संपर्क साधत आहे. 


या अटी पूर्ण कराव्या लागतात


यूट्यूबवर पैसे कमवण्याआधी तुम्हाला काही अटी पूर्ण कराव्या लागतील. YouTube च्या पॉलिसी अंतर्गत, क्रिएटिव्ह्सचे वय 13 ते 18 वर्षांच्या दरम्यान असल्यास, तुमच्याकडे पालक किंवा पालकांच्या स्वीकृत अटी असणे आवश्यक आहे. यानंतर तुम्हाला AdSense अकाऊंट देखील चॅनेलशी लिंक करावे लागेल. 180 दिवसांच्या आत तुमच्या चॅनेलवर तुमचा किमान एक छोटा व्हिडिओ अपलोड झालेला असणे आवश्यक आहे.


YouTube भागीदार कार्यक्रम


कंपनीचे म्हणणे आहे की YouTube Shorts प्लॅटफॉर्म हे YouTube Partner Program पेक्षा वेगळे आहे. म्हणजेच, YouTube Shorts वर कमाईचा नियम वेगळा आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, ऑगस्ट 2021 मध्ये, या प्लॅटफॉर्मवरील सर्वोत्कृष्ट क्रिएटिव्ह्सना 10 हजार डॉलर्स म्हणजेच प्रत्येक महिन्याला 7.5 लाख रुपये दिले गेले आहेत.


महत्वाच्या बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha