मुंबई : शॉर्ट व्हिडीओ म्हटलं की  Tik Tok, हे समीकरणचं झालं आहे. परंतु, टिकटॉक बॅन झाल्यानंतर अनेक युजर्सचा हिरमोड झाला आहे. पण अशातच इतर अॅप्स युजर्सच्या मदतीसाठी सरसावल्याचं पाहायला मिळतंय. अनेक अॅप्सनी टिकटॉक सारखे फिचर्स देऊन युजर्सना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला. पण टिकटॉकची जागा कोणीच घेऊ शकलं नाही. आता Google च्या YouTube ने Tik Tok ला टक्क देण्यासाठी कंबर कसली आहे. गेल्य वर्षी टिकटॉक बॅन झाल्यानंतर युट्यूबने शॉर्ट व्हिडीओ फिचर Shorts लॉन्च केलं होतं. ज्यामध्ये युजर्स टिकटॉक प्रमाणे व्हिडीओ तयार करु शकतात. अशातच आता कंपनीने घोषणा केली आहे की, युजर्स शॉर्ट व्हिडीओ तयार करुन पैसेही कमावू शकतात. 


YouTube गोळा करतंय 100 मिलियन डॉलर्स फंड 


YouTube ने 100 मिलियन डॉलर्स फंड गोळा करण्यास सुरुवात केली आहे. यामुळे कंपनी शॉर्ट व्हिडीओ क्रिएटर्सना पेमेंट देणार आहे. युट्यूब व्हिडीओ क्रिएटर्सना व्ह्युअरशिप आणि एगेजमेंटच्या आधारावर पेमेंट करणार आहे. कंपनीने आपल्या शॉर्ट व्हिडीओवर जाहीरात देण्यासही सुरुवात केली आहे. 


टिकटॉकला देणार टक्कर 


जगभरात तरुणांमध्ये प्रसिद्ध झालेलं सोशल मीडिया अॅप टिकटॉकला मात देण्यासाठी युट्यूबने हा निर्णय घेतला आहे. क्रिएटर्सना पैसे देऊन तरुणांमध्ये युट्यूब Shorts लोकप्रिय करण्याचा कंपनीचा मानस आहे. जास्तीत जास्त तरुणांनी या फिचरचा वापर करावा, हाच कंपनीचा मानस आहे. 


कोणीही करु शकतं शॉर्ट व्हिडीओ अपलोड 


YouTube ने शॉर्ट्स व्हिडीओ फिचर लॉन्च करुन तरुणांना पर्वणीच दिली होती. अशातच आता यातून पैसे कमावण्याचा मार्ग दाखवत तरुणांना आपल्याकडे आकर्षित केलं आहे. युट्यूबने शॉर्ट व्हिडीओ फिचर वापरणं सोप केलं आहे. त्यामुळे अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने युट्युबवर शॉर्ट व्हिडीओ तयार करता येणार आहेत. त्यामुळे युट्युबचं शॉर्ट्स टिकटॉकला मागे टाकणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या :