Battlegrounds mobile india या नावाने तिरंग्यात पुन्हा तोच धमाकेदार मोबाईल गेम लवकर येत असल्याची घोषणा झालेली आहे.


गेमर्स आणि नेटिझन्ससाठी ही खरंतर धमाल बातमी आहे, असंच म्हणावं लागेल, चीन विरोधात भारताने पाऊल उचलले आणि चक्क प्रायव्हसीच्या संबंधी विषयात PUBG GAME सहित 118 aaps वर बंदी आणलेली होती, पब्जी बंद झाल्यावर नेटिझन्समध्ये उमटलेला एक नाराजीचा सूर भन्नाट मिन्स ते एका मुलाचा पब्जी बॅन का झालं? म्हणून राग व्यक्त करणारा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला होता, तर आयपीएलला लागलेला ब्रेक आणि अशातच नवी घोषणा चर्चेचा विषय ठरत आहे.


Battlegrounds Mobile India


गेल्या वर्षीपासूनच Pubg पुन्हा कधी येणार की, येणारच नाही? या उत्सुकतेवर आज अखेर पडदा पडलेला पाहायला मिळत आहे. battlegroundsmobileindia.com ही वेबसाईट आज लॉन्च झालीए.  वेबसाईट सर्व गेमर्स आणि PUBG प्रेमींसाठी एक महत्वाची घोषणा घेऊन आली आहे. ती म्हणजे, KRAFTON ने ऑफिशियली हा गेम येणार असल्याची घोषणा केली आहे.  


जिथं तिरंगी रंगात Battlegrounds Mobile India असा नवीन लोगो आणि कुठेही Tencents चा किंवा PUBG चा उल्लेख न करता इथं सरळ सरळ नवीन गेमच तयार केलेला आहे आणि याचं प्री रजिस्ट्रेशन हे लॉन्चच्या पूर्वी सुरु होणार असल्याचं समजतंय आणि सर्वात महत्वाचे वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार, इथं त्यांनी प्रायव्हसी बद्दल देखील केलेले बदल सांगितले आहेत. इथं लोकल कायद्यानुसार, सर्व अत्यावश्यक बदल केलेले असून सर्व डेटा हा भारतातच राहणार असल्याचे स्पष्ट केलंय. जसं की तुम्हाला माहीत आहे. आधी या पब्जीचं नाव असलेलं वेरिफाईड युट्यूब चॅनेल आता Battlegroundsmobileindia या नव्या रूपाने आलेलं आहे आणि जुना सगळा व्हिडीओ कॉन्टेन्ट हा काढून टाकलेला असून एक नवा Coming Soon चा 10 सेकंदाचा एक व्हिडीओ नेटिझन्सचं लक्ष वेधून घेत आहे.


काय असेल नवीन?


मे महिन्यात याचं धमाकेदार प्रमोशन आणि प्री रजिस्ट्रेशन असेल आणि जून महिन्यात सगळ्यांना हा गेम खेळायला मिळेल. 


हा गेम फक्त भारतातील नेटिझन्ससाठी असेल. 


वेगवेगळी आउटफिट म्हणजे प्लेयर्ससाठीचे कपडे/अवतार असतील. 


भारताची E Sport गेम असेल!


पण, भारतातील आणि परदेशातील युजर्सला एकत्र खेळता येईल का? हे मात्र पाहावं लागेल