मुंबई: श्रीमंतीचं प्रतिक आणि अलिशान असलेली बीएमडब्लू कार आता मुंबईकरांचा प्रवास सुखकर करणार आहे. कारण बीएमडब्लू कार आता टॅक्सीच्या रुपात मुंबईत धावाताना लवकरच दिसणार आहे.

बीएमडब्लू आणि ओलानं एकत्रित येऊन यासंदर्भात घोषणा केली आहे. 22 रुपये किलोमीटर दरानं ही गाडी ओलाच्या अॅपवर उपलब्ध होणार आहे.

मुंबई, दिल्ली आणि बंगळरुमध्ये ओला ही सेवा सुरु होणार असून या शहरात बीएमडब्ल्यूच्या प्रवासासाठी कमीतकमी 250 रुपये आणि प्रतिकिलोमीटर 21 ते 22 रुपये आकारले जातील. त्यासाठी ओलाकडून पुढील सहा महिन्यात एक हजार गाड्या रस्त्यावर उतरवल्या जातील.

दरम्यान, यासाठी ओलाकडून बीएमडब्ल्यू चालवण्याची इच्छा असणाऱ्यासाठी स्वस्तदरात कर्जही उपलब्ध करुन दिले जाणार आहे.